शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Mining Issue : केंद्राची 'ती' पत्रं गोवा सरकारने लपवली, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 18:23 IST

गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे.

पणजी : गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान कार्यालयातून आणि अशाच आशयाचे केंद्रीय खाण मंत्रालयाकडून आलेले पत्र अशी दोन्ही पत्रे सरकारने दाबून ठेवली आणि खाण अवलंबितांशी वेळोवेळी खोटारकडेपणा केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला असून ही पत्रे लपवून ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची माफी मागून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हे सरकार खाणी पूर्ववत सुरू करण्याबाबत मुळीच गंभीर नाही,असा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाण लिजांचे नूतनीकरण रद्द करणारा आदेश गेल्या फेब्रुवारीत दिला त्यानंतर राज्य सरकार झोपून आहे. मुख्यमंत्र्यांनी तब्बल आठ महिन्यांनंतर केवळ एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले, यापलीकडे काहीच केले नाही. फेरविचार याचिकेच्या बाबतीतही काही केले नाही. सरकारने जनतेसाठी विनाविलंब ही पत्रे जनतेसाठी जाहीर करायला हवीत, असे चोडणकर म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, ‘ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात आता वर्ष पूर्ण होत आले आहे तरी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. निव्वळ खोटारडेपणा केला. खाणींच्या बाबतीत सरकारमधील मंत्र्यांची विसंगत विधाने येत आहेत. कोणीही नीट सांगत नाही, प्रत्येकजण दिशाभूल करीत आहे. केंद्रात मंत्री असूनही श्रीपाद नाईक यांना पंतप्रधान मोदी यांची साधी अपॉइंटमेंट घेणे शक्य झाले नाही. आता लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने अवलंबितांना भाजप पुन: आश्वासने देईल परंतु लोकांनी त्यास बळी पडू नये. 

टॅग्स :goaगोवाMining Scamखाण घोटाळा