शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मुलीला मंत्र्यांकडे नेले असते का? गोमेकॉच्या डीन ला डॉक्टरांचा घेराव घालून प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:45 IST

तुमची स्वत:ची मुलगी असती तर नेली असते का मंत्र्यांकडे ? असा खडा सवाल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी गोमेकॉचे डीन डॉ प्रदीप नाईक यांना सोमवारी घेराव घालून विचारला.

 पणजी - तुमची स्वत:ची मुलगी असती तर नेली असते का मंत्र्यांकडे ? असा खडा सवाल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी गोमेकॉचे डीन डॉ प्रदीप नाईक यांना सोमवारी घेराव घालून विचारला. आमदाराचे न ऐकल्यामुळे मंत्र्यांच्या कार्यालयात नेऊन लेखी चूक मागायला लावण्याच्या प्रकरणात निवासी डॉक्टर संतप्त झाले आहेत. आमदाराला वेळेवर माहिती न दिल्यामुळे आमदाराने मंत्र्याकडे तक्रार केली व मंत्र्याने  त्या महिला डॉक्टरला आपल्या कार्यालयात घेऊन येण्याची सूचना गॉमेकॉचे डीन प्रदीप नाईक यांना केली होती व त्याप्रमाणे अधिकृत आदेश न देता त्या महिला डॉक्टरला मंत्र्यांच्या खाजगी कार्यालयात घेऊन गेले होते  आणि तिथे तिला लेखी चूक मागायला लावली होती. या घटनेचे वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध झाल्यानंतर निवासी डॉक्टरांकडून त्याची तत्काळ दखल घेताना सोमवारी सकाळी डीनच्या कार्यालयाला घेराव घातला. त्यावेळी संतापलेल्या डॉक्टरांनी हा प्रश्न डीन नाईक यांना केला. संतापलेल्या डॉक्टरच्या प्रश्नांच्या बडिमारामुळे निरुत्तर झालेले डीन नाईक यांच्यापुढे माफी मागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी घटनेबद्दल माफी मागितली. यापुढे असे घडू देणार नाही असे आश्वासनही त्यांना दिले. त्याच बरोबर गोमेकॉच्या  मेडीसीन विभागाच्या डॉक्टरच्या बाबतीत हे घडल्यामुळे विभाग प्रमुख एडवीन गोम्स यांनीही माफी मागितली अशी माहिती  गोमेकॉच्या निवासी डॉक्टरकडून ही माहिती देण्यात आली. 

डॉक्टरच्या निलंबनाचा आदेश?ज्या महिला डॉक्टरची आमदाराने तक्रार केली होती व तिने न केलेल्या चुकीबद्दल लेखी माफी मागूनही हे प्रकरण थांबलेले नाही. तिच्या निलंबनाचा आदेश निघाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. डॉक्टरांच्या मोर्चानंतर हा आदेश स्थगित ठेवण्यात आला आहे. अद्याप त्या डॉक्टरला देण्यात आलेला नाही.

टॅग्स :goaगोवा