शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : लुटीची वसूली प्रक्रिया खाण खात्याकडून सुरू, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सुचलं शहाणपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 10:08 IST

खाण घोटाळा प्रकरणात लुटीची वसुली करण्यासाठी गोवा खाण खात्याकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

वासुदेव पागी/ पणजी - खाण घोटाळा प्रकरणात लुटीची वसुली करण्यासाठी गोवा खाण खात्याकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. खात्याकडून पहिले प्रकरण हाती घेण्यात आले आहे ते बेकायदेशीरपणे पावर आॅफ एटॉर्नी घेऊन उत्खनन करण्याच्या प्रकरणात एसआयटीकडून अटक करण्यात आलेला इम्रान खान याचे. सर्वोच्च न्यायालयाच्या वसुलीसंबंधी आदेशानंतर ही कारवाई सुरू झाली आहे. खाण घोटाळा प्रकरणातील बहुतेक सर्व प्रकरणात एसआयटीने आरोपपत्रे दाखल केली असली तरी वसुलीच्या कामाला सुरूवात झाली नव्हती. खाण खात्याकडून ही वसुली सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. इम्रान खान याच्याकडून लुटीची वसुली करण्यात यावी यासाठी एसआयटीने खाण खात्याला एका महिन्यापूर्वी पत्र लिहिले होते. त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

खाम खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात कारवाईसाठी आताच फायली सरकू लागल्या आहेत. इम्रान खानच्या घोटाळ्या संबंधात खाण खात्याकडे काहीच माहिती नसल्यामुळे आवश्यक कागदपत्रे खाण खात्याला देण्यात यावीत अशा आशयाचे पत्र खाण खात्याकडून एसआयटीला पाठविले आहे. एसआयटीकडून या बाबतीत लवकरच खाण खात्याला माहिती पुरविली जाणार आहे.  इमिलिया फ्रिग्रेडो यांच्या खाणीची चौकशी केली असता मोठा घोटाळा आढळून आला होता. फ्रिग्रेडो यांच्याकडून बेकायदेशीररित्या पावर आॅफ एटॉर्नी घेऊन इम्रान खान याने  बेसुमारपणे खनिजाचे उत्खनन केलेले आढळून आले होते.

कोणत्याही अधिकृत दाखल्याविना, परवानगी विना हे उत्खनन करण्यात आले आहे आणि त्यात सर्वज कायद्यांचे उल्लंघन करण्यात आलेले आढळून आले. त्याला अटक करून चौकशी केली असता त्याची १०० कोटी रुपयाहून अधिक कायम ठेवी आढळून आल्या होत्या. त्यापैकी ७० कोटी रुपयांच्या ठेवी गोठविण्यात आल्या आहेत. एसआयटी या प्रकरणात चौकशी करीत असली तरी वसुलीचे अधिकार एसआयटीला नाहीत. हे काम सरकारचे असल्यामुळे एसआयटीने खाण खात्याला या संबंधी पत्र लिहिले होते. परंतु जवळ जवळ महिनाभर ही फाईल तशीच पडून होती. सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील सर्व खाणींची नूतनीकरणे रद्द करतानाच लुटीच्या वसुलीचे दिलेल्या वसुलीचा धसका खाण खात्याने घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :goaगोवाMining Scamखाण घोटाळा