शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यात सर्वत्र शांततेत मतदान, पहिल्या सहा तासात ४९.०४ टक्के 

By किशोर कुबल | Updated: May 7, 2024 13:53 IST

Goa Lok Sabha Election 2024: गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत पहिल्या सहा तासात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४९.०४ टक्के मतदान उत्साहवर्धक आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.

- किशोर कुबल पणजी  - गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत पहिल्या सहा तासात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४९.०४ टक्के मतदान उत्साहवर्धक आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. दक्षिण गोव्यात कांसावली येथे सेंट थॉमस स्कूल मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवानांनी पोलिंग एजंटना बाहेर काढल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही एकमेव घटना वगळता राज्यात शांततापूर्ण मतदान चालू आहे.

दक्षिण गोव्यात प्रति तास ७ ते ८ टक्के मतदानाचा दर चांगला आहे आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७५ टक्के मतदान सहज पार केले जाऊ शकते असे विश्लेषकांनी सांगितले. जास्त उष्णतेमुळे दुपारी १ ते ३ पर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि दुपारी ३ वाजल्यापासून वेग वाढू शकतो आणि ताशी ९ ते १० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

उत्तर गोव्यात पणजी, म्हापसा, पेडणे येथील मतदार निरुत्साह दाखवत आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत पणजी केवळ २५ टक्के मतदान झाले होते. म्हापसा व पेडणे विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुक्रमे २८ टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात पहिल्या पाच तासात विक्रमी ३९ टक्के मतदान झालेले आहे.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४