शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन उठवला मात्र आठ दिवसांसाठी कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:07 IST

Goa Lockdown News: कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू केलेले जमावबंदीचे कलमही राज्यात कायम राहणार आहे.

पणजी - लॉकडाऊनसाठी वाढता दबाव असतानाही सरकारने तो धुडकावून पुढील आठ दिवसांसाठी केवळ निर्बंध कडक केले आहेत. उद्या सोमवारी सकाळी ६ वाजता लॉकडाऊन उठवला जाईल. मात्र उद्यापासून पुढील सोमवार (१० तारीख) सकाळी ६ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. निर्बंधांचे पालन न करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई केली जाईल. कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू केलेले जमावबंदीचे कलमही राज्यात कायम राहणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला संबोधताना वरील घोषणा केली. पुढील आठ दिवस सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, औषधालये, कृषिमाल विकणारी दुकाने, मासळी मार्केट, पंचायत मार्केट चालू राहील. आठवडी बाजार बंद राहतील. धार्मिक स्थळांमध्ये केवळ पुजारी पूजा करतील.भाविकांना ती बंद असतील. कॅसिनो, बार, जलसफरी करणाऱ्या बोटी, सलून, सिनेमा हॉल, जलतरण तलाव, क्रीडा संकुले बंद राहतील.

उद्योग, कारखाने मार्गदर्शक तत्त्वें पाळून चालू राहतील. रेस्टॉरंट ७ ते सायंकाळी ७ या वेळेत ५० टक्के उपस्थितीने चालू राहतील. होम डिलिव्हरीसाठी  किचन २४ तास चालू राहू शकते. एटीएम, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस दुकाने चालू राहतील तसेच बांधकाम साहित्य विकणारी दुकाने चालू असतील. सरकारी कार्यालये ५० टक्के उपस्थितीने चालू राहतील,अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शाळा, महाविद्यालयें आदी शैक्षणिक संस्था बंद राहतील. केवळ परींक्षापुरती शैक्षणिक संस्था खुली ठेवता येईल. सामाजिक, राजकीय, क्रीडा करमणुकीचे कार्यक्रम बंद राहतील. 

विवाह समारंभांना ५० लोकांपेक्षा अधिक उपस्थिती असता कामा नये तसेच अंत्यसंस्काराला २० पेक्षा अधिक लोकांना मनाई आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडचे रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने निर्बंध कडक केले आहेत. हे लॉकडाऊन नव्हे परंतु सर्वांनी  निर्बंधांचे कडक पालन करावे लागेल. महामारी तून सावरण्यासाठी डॉक्टर्स परिचारिका अथकपणे काम करत आहेत. प्राणवायूची तसेच रूग्णांसाठी खाटांची उपलब्धता केली जात आहे. जनतेने सरकारवर विश्वास ठेवावा. सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत