शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विदेशी पर्यटकांसाठी आजही आवडते ठिकाण पण पर्यटन व्यवसाय महागला- मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:40 IST

आमदार माविन गुदिन्हो यांच्या काही दिवसापूर्वीच्या दाव्याचेच केले समर्थन

म्हापसा : काशिराम म्हांबरे: गोवा हे देश विदेशी पर्यटकांसाठी अत्यंत आवडते स्थळ आहे पण विमानाचा प्रवास महागला आहे. हॉटेल्स तसेच इतर तत्सम व्यवसायाचेदर महागल्याने गोव्यात येणाºया पर्यटकांवर त्याचे परिणाम होऊन पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. महागलेले हे दर कमी करण्यासाठी उपाय योजना हाती घेऊन त्यावर नियंत्रण ठेवल्यास दर्जेदार पर्यटक गोव्यात येतील असा दावा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. आमदार माविन गुदिन्हो यांनी काही दिवसापूर्वी पर्यटन व्यवसाय महागल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे प्रतिपादन केले होते. त्याचे समर्थन आमदार लोबो यांनीही आता केले आहे.

डिसेंबरपर्यंत देशी पर्यटक गोव्यात होते पण ते दर्जेदार पर्यटक नव्हते. दर्जेदार पर्यटक झाडाखाली बसून जेवत नाहीत. वडापाव खात नाहीत. गोव्यात सर्वत्र हे चित्र दिसते यातून पर्यटनाचा दर्जा खालावतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा पर्यटकांना उत्तेजन देता कामा नये. त्यावर नियंत्रणासाठी पंचायतीची दखल घेणे गरजेचे असून झाडाखाली बसून जेवण करणाऱ्यांवर कारवाईसाठी पंचायतीने विशेष उपाय योजना हाती घेणे गरजेचे असल्याचे लोबो म्हणाले.

विमानाची भाव वाढ कमी व्हावी यासाठी सतत केंद्र सरकारकडेपत्रव्यवहार करुन ते कमी करण्याची विनंती करावी.  गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन आहे. हा दर्जा राखून ठेवणे गरजेचे आहे. येथील व्यवसायाला जागतीक स्तरावरील इतर पर्यटन स्थळाकडे स्पर्धा करावी लागते. महसूल प्राप्तीसाठी गोवा फक्त पर्यटन व्यवसायावर अवलंबून तो टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे लोबो म्हणाले.

सध्या हॉटेल्स तसेच इतर तत्सम व्यवसाय महागले आहे. हा दर्जा राखून ठेवण्यासाठी हॉटेल्स तसेच इतर तत्सम व्यवसायिकांनी हॉटेलाचे भाव  जागतिक स्तरावरील इतर हॉटेल्ससोबत तुलना करून त्यादृष्टीने लागू करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.  तसे झाल्यास चांगले दर्जेदार पर्यटक गोव्यात येतील असाही दावा लोबो यांनी बोलताना केला.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन