शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: खराब रस्त्याचे पर्यटनावर परिणाम- कळंगुट पंचायतीने व्यक्त केली चिंता

By काशिराम म्हांबरे | Updated: September 30, 2023 13:06 IST

Goa: कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर  भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.

- काशीराम म्हांबरे म्हापसा - कळंगुट पंचायत क्षेत्रातील खराब रस्त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. रस्ते खराब असल्याने पर्यटक कळंगुटकडेपाठ फिरवली आहे. कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर  भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.

कळंगुट पंचायत मंडळाने सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिशदेत हा इशारा दिला आहे. यावेळी उपसरपंचा गीता परब तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.

सुमारे तीन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी नागरिकांच्या समस्यांवर तोडग्यासाठी म्हापसा शहरात जनता दरबार भरवला होता. त्यात खराब रस्त्यांचा मुद्या पंचायतीकडून उपस्थित करण्यात आलेला. मंत्र्यांनी खात्याच्या अभियंत्यांना तातडीने उपाय योजना हाती घेण्याचे आदेश दिलेले पण तीन महिन्यानंतर आजही त्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे सिक्वेरांनी निदर्शनाला आणून दिले.

रस्ते पंचायत क्षेत्रातील असले तरी ते सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत येत असल्याने त्यांची दुरुस्ती सरकारकडून केली जाते. खात्याच्या तसेच त्यातील अभियंत्यांच्या या निष्क्रियतेवर नागरिक लोक प्रतिनिधींना जबाबदार धरतात. उत्तर जाप लोकप्रतिनिधींना द्यावा लागतो . पंचायतीकडून दुरुस्ती हाती घेतल्यास मंडळा विरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. अशावेळी सरकारकडून त्यात हस्तक्षेप करून दुरुस्ती हाती घेण्यात यावी अशी सुचना सिक्वेरा यांनी केली. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन