शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा

By किशोर कुबल | Updated: February 20, 2024 15:22 IST

Lok sabha Election 2024: काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

- किशोर कुबल पणजी - काँग्रेसने दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सरदेसाई म्हणाले की, 'सार्दिन यांनी फातोर्डा मतदारसंघात काडीचेही काम केलेले नाही. मी या मतदारसंघाचा आमदार असूनही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कधीच माझी किंमत केली नाही. अशा व्यक्तीला जर पुन्हा काँग्रेस तिकीट देत असेल तर मी वेगळा विचार करीन.'

'इंडिया' युतीसाठी काँग्रेस आणि आम आदमी यांच्यात चर्चा चालू असल्याचे जे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद त्यांनी केले आहे, त्याबद्दल विचारले असता तर सरदेसाई म्हणाले की,' या घडामोडीत मी पक्षकार नाही. त्यामुळे मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही.

ते एका प्रश्नावर म्हणाले की ,' भाजप संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आहे, हे वास्तव मान्य करायलाच हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवून भाजप पुन्हा निवडणुकीस सामोरे जात आहे पक्षाचा उमेदवार कोणीही असो मोदींच्या नावावर जी निवडणूक लढवली जाणार आहे. विरोधकांशी टक्कर द्यायची असेल तर असा चेहरा उभा करावा लागेल, जो 'गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण' याच्याशी एकनिष्ठ असावा. परंतु दुर्दैवाने हे अजून झालेले नाही. विरोधकांनी एकत्र येण्याच्या बाबतीत 'इंडिया' युतीचीही गोव्यात काहीच प्रगती झालेली नाही.

ते म्हणाले की 'सध्या तरी माझी भूमिका 'वेट अँड वॉच' आहे. पर्यायी उमेदवार चांगला असेल तर विचार करता येईल. एक मात्र खरे की गोवा फॉरवर्ड  लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही. कारण प्रादेशिक पक्षाने लोकसभेची निवडणूक लढवणे तेवढे सोपे नसते आणि तेवढा पैसा माझ्याकडे नाही. निवडणूक लढवण्यासाठी कोणाकडे पैशांसाठी हात पसरण्याची माझी वृत्ती नाही. आणखी महत्त्वाची बाब मध्ये म्हणजे गोवा फॉरवर्ड रिंगणात उतरवून मला विरोधकांची मते फोडायची नाहीत. दुसऱ्यांची मते खाण्यासाठी मी उमेदवार उभा करणार नाही.'

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक