शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यातील घराघरात आता बंगळुरुची नव्हे, स्थानिक झेंडूंच्या फुलांची लागणार तोरणे!

By किशोर कुबल | Updated: August 18, 2022 14:56 IST

Goa: दसरा, दिवाळी, चतुर्थी सणाला एवढेच नव्हे तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांच्यावेळी आरास करण्यासाठी गोेवेकरांना मोठ्या प्रमाणात लागणा-या झेंडूच्या फुलांसाठी आता अन्य राज्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही.

- किशोर कुबल पणजी - दसरा, दिवाळी, चतुर्थी सणाला एवढेच नव्हे तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांच्यावेळी आरास करण्यासाठी गोेवेकरांना मोठ्या प्रमाणात लागणा-या झेंडूच्या फुलांसाठी आता अन्य राज्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. याबाबतीतही ‘स्वयंपूर्ण’ बनण्याचा विडा कृषी खात्याने उचलला असून झेंडू लागवडीसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये सबसिडीच्या योजनेबाबत अधिक जागृती घडवून आणली जाणार आहे.  गेल्या वर्षी २४ हेक्टर जमिनीत झेंडू लागवड झाली. हे प्रमाण यंदा ४0 हेक्टरच्या वर नेण्याचे उद्दिष्ट खात्याने ठेवले आहे.

कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो यांनी ‘लोकमत’ला अधिक माहिती देताना म्हणाले की, ‘ दरवर्षी राज्यात सुमारे २ हजार मेट्रिक टन झेंडूची फुले आयात केली जातात. सरकारने स्थानिक शेतकºयांना लागवडीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी जाहीर केली आहेच शिवाय रोपेही उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. खाजगी नर्सरींना बियाणी देऊन झेंडूची रोपे काढली जातात. ही रोपे नर्सरीमालक प्रत्येकी ४ ते ५ रुपयाने विकतो. केपें व डिचोली तालुक्यांमध्ये झेंडूंच्या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. उर्वरित तालुक्यातील शेतकºयांनीही लागवडीसाठी पुढे यावे असे आवाहन आफोंसो यांनी केले. हेक्टरी ७५ हजार रुपये याप्रमाणे कमाल दोन हेक्टरपर्यंत दीड लाख रुपये सबसिडी दिली जाते.’

झेंडूंच्या फुलांची गोव्यात अगदीच कमी लागवड होते त्यामुळे सणासुदीच्या काळात बंगळुरु, बेळगांव तसेच अन्य ठिकाणहून ती मागवावी लागतात. प्रवासात तीन चार दिवस जातात तसेच हवामानही बदलल्याने फुले गोव्यात पोहचेपर्र्यत कोमेजून जातात. गोवेकर स्थानिक ताजी फुले शोधत असतात. थोडी महागही पडली तरी ती खरेदी करण्याची तयारी असते. परंतु स्थानिक झेंडूची फुले उपलब्ध होत नाहीत.’

गोव्यात लागवडीसाठी मोठा वाव - शिल्पा सावंत, प्रगत शेतकरी तथा नर्सरीमालकवन-कासारवाडा, डिचोली येथील वत्सला नर्सरीच्या मालक प्रगत शेतकरी सौ. शिल्पा प्रभाकर सावंत म्हणाल्या की, ‘झेंडूची रोपटी उगवून ती मी कृषी खात्याला विकते. रोपट्याचा पाच रुपये दर असतो. यंदा सहा हजार बियाणी घातलेली आहेत. स्वयंसहाय्य गटामधील महिलांनाही मी याबाबत मार्गदर्शन करते. गोव्यात प्रत्येक सणाला झेंडूची फुले लागतात. लागवडीसाठी मोठा वाव असून शेतकºयांचे आर्थिक उत्पन्नही यामुळे वाढेल.’शिल्पा सावंत या केवळ झेंडूचीच लागवड करतात असे नव्हे, तर हळदीचीही लागवड करतात. यंदा त्यांनी २0 किलो हळद लागवड केली आहे. नर्सरीमध्ये त्या गांडूळ खत निर्मितीही करतात. माणगांव येथे प्रशिक्षण घेऊन आलेल्या शिल्पा आंबा यावरही वर्ग घेतात.

टॅग्स :goaगोवाagricultureशेती