शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गोवा विद्यापीठाला हायकोर्टाचा धक्का; प्रवेश परीक्षा रद्द ठरविण्याचा आदेश तूर्त स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:57 IST

या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बी.ए., एलएलबी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा रद्द करण्याच्या कृतीला साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. खंडपीठाने हे प्रकरण दाखल करून घेऊन सोमवारपर्यंत जैसे थे परिस्थिती राखण्याचा आदेश दिला. त्यामुळे खंडपीठाचा परीक्षा रद्द करण्याचा आदेश सोमवारपर्यंत (दि. ३१ जुलै) स्थगित झाला आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत विद्यापीठाला या प्रकरणात तोडगा काढावा लागणार आहे. तसेच ८ जून रोजी घेतलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मोकळीकही देण्यात आली आहे.

एलएलबी अभ्यासक्रमासाठीच्या जीक्लेट प्रवेश परीक्षेत घोळ झाल्याची तक्रार कारे महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी गोवाविद्यापीठाकडे केली होती. विद्यापीठाकडून या प्रकरणात चौकशी करण्यासाठी प्रो. सविता केरकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नियुक्त केली होती. या समितीने या प्रकरणाची चौकशी करून दिलेल्या अहवालात महाविद्यालयाचे प्राचार्य साबा दा सिल्वा यांच्याकडून घोळ करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला शिफारस करण्यात आली होती.

त्यानंतर विद्यापीठाने प्रवेश परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा करून ६ ऑगस्ट ही तारीखही जाहीर केली. तसेच निकालाची तारीख ही ८ ऑगस्ट असल्याचेही जाहीर केले आहे. गोवा विद्यापीठाच्या निर्णयाला महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले. एका प्राचार्याची शिक्षा १८० विद्यार्थ्यांना का देता? असा त्यांचा प्रश्न आहे.

 

टॅग्स :goaगोवाuniversityविद्यापीठ