शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : डेंग्यूविषयी आरोग्य खाते राबविणार खास माेहिम, कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:10 IST

आरोग्य खाते डेंग्यूविषयी जनजागृती वाढविण्यासाठी आणखी सक्रिय झाले आहे.

नारायण गावसपणजी: आरोग्य खाते डेंग्यूविषयी जनजागृती वाढविण्यासाठी आणखी सक्रिय झाले आहे. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत तेेथे आरोग्य कर्मचारी लोकांना घेऊन जनजागृती करणार आहे. ज्या भागात गेल्या वर्षी रुग्ण आढळून आले हाेते तेथे पुन्हा पावसाळ्यात डेंग्यू आढळू नये यासाठी खास माेहीम आयोजित केली जाणार आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी अचानक डिचाेली परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. पावसाळा नसला तरी साठवलेल्या टाकीच्या पाण्यात हे डेंग्यूचा पसार झाला होता. या विषयी या लोकांना सांगूनही तेथे पाणी साचविण्यात आले हाेते. पण आता आरोग्य कर्मचारी या ठिकाणी फवारणी व अन्य जनजागृता करुन आता पूर्णपणे नियंत्रणात आणले आहे. काही लोकांना सांगूनही ते आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचवून ठेवतात तसेच आपल्या पाण्याची टाकीची साफसफाई करत नाही.  म्हणून डेंग्यूचा पसार होत आहे, असे डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या.कामगार लोकवस्तीत डेंग्यूची लागणराज्यात सध्या डेंग्यूचे लागण होत आहे ती जास्तीत जास्त कामगार लोकवस्तीत हाेत आहे. परप्रांतीय कामगार आहे जे बांधकाम क्षेत्र आहे. अशा ठिकाणी डेंग्यूचा पसार वाढतो. काही कामगार हे बाहेरुन डेंग्यूचा ताप घेऊन ते राज्यात येत असतात. त्यामुळे  अशा वेळी डेंग्यूवर नियंत्रण आणणे आणखी कठीण जाते.  तरीही खात्याचे कर्मचारी कामगार लोकवस्तीत जाऊन त्यांना जागृत करत आहेत, असे डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या.शहरी भागात काही हॉटस्पॉटराज्यात ग्रामीण भागात डेंग्यूचा पसार झाला नाही. शहरी भागात काही ठिकाणी डेंग्यूचे  रुग्ण अजून आढळून येत आहेत. या म्हापसा करासवाडा, वास्को वाडे, मडगाव, चिंबल अशा काही भागात हे रुग्ण आढळून येत आहेत. या परिसरात जास्त प्रमाणात कामगार लाेक राहतात. झाेपडपट्टीच्या जागेत अशा ठिकाणी हे डेंग्यू वाढत आहे, असेही डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा