शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आर्थिक आणीबाणीच : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 20:28 IST

राज्यावर 2012 सालापर्यंत फक्त सात हजार कोटींचे कर्ज होते.

पणजी : राज्यावर 2012 सालापर्यंत फक्त सात हजार कोटींचे कर्ज होते. आता एकूण 22 हजार कोटींचे कर्ज आहे. यापुढील तीन वर्षात ते पंचवीस हजार कोटींपर्यंत जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने गोव्यावर आर्थिक आणीबाणी लादली आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.गोव्यात अत्यंत वाईट आर्थिक स्थिती निर्माण झाली असल्याचे आम्ही गेल्या ऑक्टोबर महिन्यात दाखवून दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री निलेश काब्राल यांना पुढे केले व काब्राल यांच्यामार्फत आमच्यावर टीका केली. आमचे दावे खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला पण गेल्या 24 डिसेंबर रोजी अर्थ खात्याने परिपत्रक जारी केले आणि सर्व खात्यांना वीस टक्क्यांनी खर्च कमी करण्याचा आदेश दिला आहे. यावरून राज्यातील आर्थिक आणीबाणीच स्पष्ट होत आहे, असे चोडणकर म्हणाले. वास्तविक पावसाच्या मोसमात रस्ते व अन्य विकास कामे करता येत नाहीत. त्यांचा वेग मंदावतो.खर्चाची सगळी कामे ही डिसेंबरपासून सुरू होत असतात पण सरकारने खर्च करून नका असा आदेश आता जारी केला आहे. कारण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. ही चिंताजनक स्थिती असल्याने मुख्यमंत्र्यांनी यावर स्वत: भाष्य करावे. त्यांनी श्वेतपत्रिका जारी करावी, असे चोडणकर म्हणाले. गोव्यावरील कर्जाचे प्रमाण 22 हजार कोटींवर पोहचल्याचे आरबीआयने दाखवून दिले आहे. सरकार प्रचंड कर्ज घेत असून प्रथमच महिन्याभरात 681 कोटींचे कर्ज सरकारने घेतले. यापुढे जानेवारी व फेब्रुवारीत मिळून सरकार आणखी सातशे कोटींचे कर्ज काढील. राज्य वित्त आयोगालाही सामोरे जाण्यास सरकार घाबरत आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली व सध्याच्या आर्थिक आणीबाणीला स्व. मनोहर र्पीकर व प्रमोद सावंत हे दोघेही जबाबदार असल्याचे ते म्हणाले.