शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : हरमल येथे पेट्रोल पंपानजिकच्या गवतास आग, परिसरात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:39 IST

वारंवार अशा आगीच्या घटना परिसरात घडू लागल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. 

हरमल : येथील मधलावाडा- कोरकण भागातील पेट्रोल पंपाच्या ओसाड परिसरात वाळलेल्या गवताला आग लागल्याने एकच घबराट उडाली. सुदैवाने या आगीत फारसे नुकसान झाले नाही. मात्र वारंवार अशा आगीच्या घटना परिसरात घडू लागल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा आगीचा प्रकार घडला. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरली. ही आग शेजारील स्मशानभूमीपर्यंत पोहोचली. याच्या बाजूलाच काजू बागायत आहे. त्यामुळे तेथेही आग पसरण्याचा धोका होता. हरमलचे पंच सदस्य सुशांत गावडे यांनी फोनवरून पेडणे अग्निशमन दलाशी संपर्क साधला. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीच्या ज्वाळामुळे वीज वाहिन्यांना धोका पोचण्याची शक्यता होतीय. तत्पूर्वीच वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून वीज पुरवठा खंडित करत सहकार्य केले, अशी माहिती पंच गावडे यांनी सांगितले. 

दरम्यान, या भागातील काजू बागायत, किनाऱ्यावरील शॅक्स, हट्स परिसरात काही वर्षापूर्वी आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. दरवर्षी काजू बागायती बेचराख होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. आगीच्या घटनाची माहिती पेडणे अग्निशमन दलास दिली जाते. मात्र तेथून अश्निशमन दलाचे बंब पोचण्यासाठी ४० ते ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे या भागात स्वंतत्र अग्निशमन दलाच्या बंबाची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. पर्यटन हंगाम व काजू बागायतीचा मोसम पाहता मांद्रे किंवा हरमल येथे अग्निशमन दलाची गाडी तैनात केल्यास आगीच्या घटनांतून नुकसान टाळता येईल, अशी मागणी पंच गावडे यांनी केली.

टॅग्स :goaगोवा