शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे: सुरजेवाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 21:42 IST

गोवा विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करायला सांगण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे.

पणजी: गोवा विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करायला सांगण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे. सरकार बहुमत गमावून बसल्याचा दावा त्यांनी केला आहे.लोकविश्वास गमावलेल्या गोवा सरकारने आता विधानसभेत बहुमतही गमावले असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला. या पक्षाचे आमदारही तसे बोलत आहेत. आता मंत्रीही सरकारबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. यावरूनच गोवा सरकार आता कुणाच्याच विश्वासाचे राहिलेले नाही हे सिद्ध झाले आहे. विधानसभा अधिवेश्न गेऊन गोवा सरकारने शक्ती परीक्षण करण्यास लावण्यासाठी कॉंग्रेसकडून केंद्र सरकारवर राष्ट्रीय स्तरावर दबाव आणला जाईल असेही त्यांनी सांगितले.आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारातून लवकर बरे व्हावेत म्हणून कॉंग्रेस प्रार्थना करते आहे, परंतु खुद्द भाजपवाले त्यांच्या आजाराचा राजकीय फायदा उठवित आहेत. त्यांना केवळ मुखवटा बनवून राज्यावर अधिकार गाजवित आहेत असा आरोप त्यांनी केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी मंजुरीनंतर फाईल पुढे पाठविण्यात आल्याचे जे लिहिले जात आहेत ते बेजबाबदारपणाचे व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या मुख्यसचिवांनी जबाबदारीने वागायला हवे असे ते म्हणाले.राज्यात प्रशासन कोलमडले आहे. बेरोजगारीने जनता त्रस्त आहे.लोकांची कामेही अडकली आहेत अशा परिस्थितीतील या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले. खरे म्हणजे आजारपणामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: होवून मुख्यमंत्रीपद सोडायला हवे होते. फ्रान्सीस डिसोझा आणि पांडुरंग मडकईकर हे आजारी असल्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून हटविले परंतु स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही पद सोडायला तयार नाहीत, ही विसंगती असल्याचे त्यांनी सांगितले.