शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सासष्टीतील कोविड रुग्णांच्या सुरक्षेबद्दल सरकार गंभीर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 12:50 IST

जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जात असताना गोवा सरकारला सासष्टीच्या कोविड रुग्णांच्या सुरक्षेचे खरेच पडून गेले आहे का असा सवाल सर्वसामान्य लोक करू लागले आहेत.

मडगाव - गोव्यात कोविडचे रुग्ण वाढत असताना राज्यात प्रत्येक तालुक्यात कोविड निगा केंद्र स्थापन करा अशी मागणी होत असताना दक्षिण गोव्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या सासष्टी तालुक्यातील सर्व निगा केंद्रे बंद केल्याने आता या तालुक्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी शिरोडा, फार्मगुडी किंवा वास्को येथे जावे लागते. आज 17 सप्टेंबर रोजी सगळीकडे जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जात असताना गोवा सरकारला सासष्टीच्या कोविड रुग्णांच्या सुरक्षेचे खरेच पडून गेले आहे का असा सवाल सर्वसामान्य लोक करू लागले आहेत.

तालुक्यात यापूर्वी ईएसआय इस्पितळामध्ये कोविड इस्पितळ सुरू करण्याबरोबरच मडगाव रेसिडेन्सी, कोलवा रेसिडेन्सी आणि फातोर्डा मल्टिपर्पज स्टेडियममध्ये कोविड निगा केंद्रे सुरू केली होती मात्र आता त्यापैकी मडगाव रेसिडेन्सी कोविड बाधित आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यासाठी वापरात येत असून कोलवा आणि फातोर्डा येथील निगा केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शिरोडा, फर्मागुडी आणि वास्को येथील निगा केंद्रातील रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाल्याने सासष्टीतील दोन निगा केंद्रे बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र यामुळे सासष्टीतल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दूर जाण्याची पाळी आलेली असून त्यांच्या कुटुंबियांचीही त्यामुळे परवड होत आहे. नवीन जिल्हा इस्पितळातील वरचे रिकामे असलेले दोन मजल्यांचा  कोविड निगा केंद्र म्हणून उपयोग करावा या मागणीकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे.

सरकारच्या या अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना आपचे दक्षिण गोवा निमंत्रक सिद्धार्थ कारापूरकर यांनी एका बाजूने सरकार गोव्यात कोविड रुग्णांची संख्या दर दिवशी 1 हजारवर पोहोचणार असे म्हणते आणि दुसऱ्या बाजूने सुरू केलेली निगा केंद्रे बंद का करते असा सवाल केला आहे. जिल्हा इस्पितळाचे वरचे दोन मजले निगा केंद्र म्हणून वापरता येणे शक्य आहे असे तज्ञ सांगतात तरीही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते असा सवाल त्यांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार कोलवा रेसिडेन्सीचा वापर मडगावात सुरू करण्यात येणाऱ्या कोविड इस्पितळातील डॉक्टरांना ठेवण्यासाठी तर मल्टिपर्पज स्टेडियमचा वापर अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यातासाठी करण्याचा सरकारचा मानस आहे. या संबंधी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई याना विचारले असता सासष्टीकरांचे या सरकारला काहीच पडून गेलेले नाही हेच त्यावरून सिद्ध होते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा