शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Goa : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत अनेक मंत्री सैरभैर, सरकारी परिपत्रकाने वाढवला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:08 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत. तशात वीजमंत्री निलेश काब्राल यांच्यामार्फतच यापुढे सर्व सरकारी फाईल्स, कागदपत्रे वगैरे जायला हवीत, असे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी करून गोंधळ वाढविला. काही मंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आणि परिपत्रक मागे घेण्यास मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांना भाग पाडले आहे.

राज्यातील काही तालुक्यांत पिण्याचे पाणी बंद झालेले आहे, राज्यात मासळीच्या आयात बंदीवरून वाद पेटला आहे, खनिज खाणी बंद असल्याने राजकीय नेत्यांच्या घरांवर व कार्यालयांवर शेकडो खाण अवलंबित मोर्चे नेऊ लागले आहेत. पण या स्थितीत प्रशासनाची सगळी सूत्रे हाती घेऊन समस्यांवर कायमस्वरुपी उपाय काढणारा कोणीच नेता मंत्रालयात किंवा सचिवालयात नाही, असा अनुभव गोव्याला येत आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाहीत, तर मगोप सरकारमधून बाहेर पडेल असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी देऊन दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

आपली कामे वेगाने होत नाहीत, नोकरशाही हवे तेवढे सहकार्य करत नाही असा सूर काही मंत्र्यांनी लावला आहे. सरकारमधील महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी तर नोकरशाही कार्यक्षम नाही असे जाहीरपणे दोनवेळा नमूद केले. स्थिती गोंधळाची असतानाच सरकारने काल-परवाच एक परिपत्रक जारी केले व सर्व सरकारी फाईल्स व कागदपत्रे व पत्रे यापुढे वीज मंत्री काब्राल यांच्याच कार्यालयामार्फतच जावीत असे स्पष्ट केले. म्हणजेच कोणत्याही सचिवाला, कोणत्याही महामंडळाला किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिका-याला जो नोट किंवा पत्र येईल ते वीज मंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठविले जावे असे बजाविले गेले.

यामुळे काही मंत्री संतप्त बनले. काब्राल हे पर्रीकर यांच्या गैरहजेरीत प्रभारी सीएम झालेले आहेत काय असा प्रश्न मंत्र्यांना पडला व त्यांनी मुख्य सचिव शर्मा यांच्याशी संपर्क साधला. परिपत्रक त्वरित मागे घ्या अशी मागणी मंत्र्यांनी केली. परिपत्रकात तांत्रिक चुका राहिल्या असून ते परिपत्रक मागे घेतले जाईल किंवा पूर्ण दुरुस्त केले जाईल,अशी ग्वाही मुख्य सचिवांनी दोघा मंत्र्यांना दिली. आता हे नवे परिपत्रक कधी येते याकडे सगळे मंत्री लक्ष ठेवून बसले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर हे अजून काही दिवस सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकणार नाहीत. ते आपल्या घरीच विश्रंती घेत आहेत. अधूनमधून थोडे कामही ते करतात पण त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा आहे. पूर्वीच्या तुलनेत आरोग्य आता सुधारले आहे, असे सांगितले जाते.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर