शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : किनारी भागात गोमंतकीयांच्या घरांचे रुपांतर काश्मिरींच्या व्यवसाय केंद्रांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:32 IST

उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे.

पणजी : उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे. 10 वर्षापूर्वी 10 ते 12 हजार काश्मिरी पूर्ण किनारपट्टीत व्यवसाय करताना आढळून यायचे. आता हे प्रमाण 40 हजारांच्या पुढे गेले आहे. गोमंतकीयांनी आपली घरे काश्मिरींना व्यवसाय करण्यासाठी भाडेपट्टीवर देणे सुरू केले आहे.

काश्मिरींनी प्रथम उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत आपले बस्तान मांडले. त्यानंतर दक्षिण गोव्यात काश्मिरी व्यवसायिकांची संख्या वाढू लागली. प्रस्तुत प्रतिनिधीने कोणकोण तालुक्यासह दक्षिण गोव्यातील अन्य काही किना-यांना भेट दिली असता हजारो काश्मिरी व्यवसायिक विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करताना दिसून आले. बहुतांश काश्मिरी उत्तर गोव्यातही कपडे विक्रीचे काम करतात. दक्षिण गोव्याच्या राजबाग, पाळोळे, आगोंद या किना-यांवर बहुतांश काश्मिरी कपड्यांसह आकर्षक शोभेच्या वस्तू, विविध प्रकारच्या चहा यांची विक्री करतात.

गोमंतकीयांनी आपल्या घरचा पुढील भाग काश्मिरी व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी दिला असून घराच्या मागील भागात ही गोमंतकीय कुटुंबे राहतात. काही भागांत तर गोमंतकीयांनी किना-यांवरील आपली जुनी घरे सोडली व मडगाव आणि अन्य भागांमध्ये फ्लॅट घेऊन राहणो पसंत केले आहे. अशा गोमंतकीयांकडून किना-यांवरील पूर्ण घरे काश्मिरींना भाडेपट्टीवर दिली गेली आहेत.

विदेशी पर्यटकांसाठी अनेक काश्मिरी योगाचे वर्ग चालवतात. विदेशींना काही भागात योगाच्या नावाखाली काहीही शिकविले जाते अशा प्रकारच्या देखील तक्रारी येतात. स्थानिकांपेक्षा विदेशी पर्यटकच काश्मिरी उत्पादने व कपडे जास्त खरेदी करताना दिसून आले. दक्षिण गोव्याच्या किना-यांवर बहुतांश रशियन पर्यटकांची सध्या गर्दी आहे. राजबाग, पाळोळे व आंगोद या तीन किना-यांवर देशी पर्यटक संख्येने खूपच कमी आहेत. विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने आढळून आले. काही काश्मिरी व्यक्ती रेस्टॉरंट्स चालवत आहेत तर काहींनी किना-यांवर लाकडी कॉटेजीस उभे करून तिथे विदेशी पर्यटकांची सोय केली आहे. 

उत्तरेत कळंगुट, कांदोळी, बागा, हरमल, अंजुणा, सिकेरी या किना-यांवर किमान पंचवीस हजार काश्मिरी व्यवसाय करत आहेत. स्थानिक विरुद्ध काश्मिरी व्यवसायिक असे तंटे जास्त प्रमाणात अजून तरी गोव्यात घडत नाहीत. मात्र पूर्ण किनारपट्टी काश्मिरी व्यवसायिकांच्या ताब्यात कधी गेली ते गोमंतकीयांना कळले देखील नाही.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन