शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यातील 'एकमेव संजीवनी सहकारी साखर कामगारांना सरकारचा दिलासा, इथेनॉल प्रकल्पात सामावून घेणार

By किशोर कुबल | Updated: August 9, 2023 23:32 IST

Goa: कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

- किशोर कुबल पणजी  - गोव्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याला 'मरणकळा' लागल्या असताना कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

रात्री उशिरा विधानसभेत कृषी, नागरी पुरवठा तसेच स्वतःकडे असलेल्या अन्य खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना नाईक  बोलत होते.ते म्हणाले की, 'जी कंपनी इथेनॉल प्रकल्प थाटणार आहे, त्या कंपनीला या कामगारांना सेवेत घ्यावे लागेल. कामगारांवर अन्याय होणार नाही.' मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,'प्रकल्पासाठी दोन वेळा निविदा काढल्या परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढल्या जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात अन्य राज्यांमध्ये कुठेही मिळाला नाही एवढा भाव ऊसाला आम्ही दिला. प्रति तर ३ हजार रुपये दिले. शेतकऱ्यांची चिंता तसरकारला आहे.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ,खाजन  जमिनींच्या बाबतीत ३६४ कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेला असून केंद्राच्या मंजुरीची आम्ही वाट पाहत आहोत. खाजन बांधांसंबंधी असलेले सर्व प्रश्न ही मंजुरी मिळाल्यानंतर मिटतील.'

विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना वेळेवर सबसिडी मिळत नाही, ऊस उत्पादनांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका केली. नागरी पुरवठा खात्याच्या अनुदान मागण्यांवर बोलताना विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी रेशनवरील तांदळाला लागलेल्या किडीचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की स्वस्त धान्य दुकानांमधून सरकारने चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवावा. स्वस्त धान्य दुकानांची वेळच्यावेळी तपासणी करावी तसेच तेथे कीटकनाशके फवारणी वगैरे गोष्टी हाती घ्याव्यात. सहा महिन्यात सर्व ११ गोदामे तीही ३.५ कोटी रुपयांमध्ये दुरुस्त करण्याचे जी भाषा सरकार करत आहेत ती दिशाभूल करणारी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी तांदूळ गहू तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले. परंतु नागरिक पुरवठा खात्याने काहीच कारवाई केलेली नाही.'

सरदेसाई यांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची  तीन वेगवेगळी पाकिटे सभागृहासमोर ठेवली. एक पाकीट मुख्यमंत्र्यांनी, एक नागरी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांनी आणि एक नागरी पुरवठा संचालकांनी न्यावे आणि तांदूळ शिजवून बघावा. तो किती निकृष्ट दर्जाचा आहे, हे दिसून येईल असे सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेgoaगोवा