शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Goa: जयपूर येथील जीआयटीबी २०२४ मधे गोवा पर्यटनाचा उत्साही सहभाग

By समीर नाईक | Updated: May 9, 2024 15:47 IST

Goa News: जयपूर, राजस्थान येथे द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझार (जीआयटीबी) २०२४ या प्रतिष्ठित कार्यक्रमात गोवा पर्यटन विभागाचा सहभाग प्रभावशाली ठरला. ५ ते ७ मे, दरम्यान आयोजित या कार्यक्रमात जगभरातील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हॉटेल मालक आणि इतर प्रभावशाली भागधारक एकत्र आले होते.

- समीर नाईक पणजी - जयपूर, राजस्थान येथे द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझार (जीआयटीबी) २०२४ या प्रतिष्ठित कार्यक्रमात गोवापर्यटन विभागाचा सहभाग प्रभावशाली ठरला. ५ ते ७ मे, दरम्यान आयोजित या कार्यक्रमात जगभरातील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हॉटेल मालक आणि इतर प्रभावशाली भागधारक एकत्र आले होते. 

जीआयटीबीमध्ये, गोवापर्यटन विभागाचे दालन एक केंद्रबिंदू ठरले. समुद्र किनारे आणि त्यांच्याशी संलग्न सुविधा, खेळ व त्या सोबत समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मनोरंजनाची साधने यांच्यासह, गोवा पर्यटन विभागाने जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले.  राज्य पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळात विभागाचे सचिव संजीव अहुजा, उपसंचालक धीरज वागळे, व्यवस्थापक विपणन अक्षय गोवेकर, व इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता. 

गोव्याच्या दलनाने उपस्थित सर्वांवर आपली छाप टाकली आणि राज्याच्या अनोख्या सवलातींकडे लक्ष वेधले. यावेळी भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याकडे पाहिले जात होते. प्रदर्शनात गोवा पर्यटनाच्या दालनात राज्यातील केवळ नयनरम्य समुद्रकिनारे आणि प्राचीन संस्कृतीचेच नव्हे तर पुनर्योजी पर्यटनासाठीची राज्याची बांधिलकी देखील दाखवून दिली. व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) आणि इंटरएक्टिव्ह स्क्रीन्स सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, अभ्यागतांना गोव्याच्या निसर्गरम्य आणि सांस्कृतिक रत्नांचा अनुभव घेता आला.

अशा प्रदर्शनी आणि कार्यक्रमात सहभाग घेऊन गोव्याचे भारतातील पहिले पुनर्योजी पर्यटनाचा मागोवा घेणारे राज्य म्हणून स्थान अधोरेखित होते. या प्रसंगी आम्ही महत्त्वाच्या भागधारकांशी संवाद साधला, त्यांच्या सहभाग करण्याच्या संधी पडताळून पाहिल्या. तसेच विवाह, वाढदिवस   या सारख्या कार्यक्रमांसाठी आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी गोवा कसे योग्य आहे हे देखील यावेळी अधोरेखित झाले, असे पर्यटन विभागाचे सचिव संजीव अहुजा यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन