शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Goa: राखीव व्याघ्रक्षेत्र आदेशास गोवा सरकारचे सुप्रिम कोर्टात आव्हान

By किशोर कुबल | Updated: September 13, 2023 14:14 IST

Goa: म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

- किशोर कुबल पणजी : म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

गोव्याची बाजू मांडण्यासाठी सरकारने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या २४ जुलै रोजी म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याचे आदेश दिले होते. वाघांच्या सुरक्षेसाठी आराखडा तयार करावा. तो निश्चित कालमर्यादेत केंद्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाला मंजुरीसाठी पाठवून द्यावा. प्राधिकरणानेही लवकरात लवकर त्याला मान्यता द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

दरम्यान, केंद्रीय व्याघ्र प्रकल्प प्राधिकरणाने ३१ मार्च २०१६ रोजी राज्य सरकारला पत्र लिहून व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यास सांगितले परंतु तसा कोणताही अधिकृत ठराव हे पत्र पाठवण्यापूर्वी प्राधिकरणाने घेतलेला नाही हा मुद्दा युक्तिवादासाठी मांडला जाण्याची शक्यता आहे.अभयारण्याची अंतिम अधिसूचना काढण्याआधी व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करणे बेकायदा ठरेल. वन्य जीव संरक्षण कायद्याच्या कलम २६ (अ) नुसार अभयारण्याची अंतिम अधिसूचना काढणे आवश्यक आहे. अभयारण्यात निवास करणाय्रांचे वन हक्क दावे निकालात काढलेले नाहीत. हे कामही बाकी आहे. वन्य जीव संरक्षण कायद्याचे कलम ३८ (व्ही) गोव्यासाठी अनिवार्य नाही, आदी युक्तिवाद केले जातील.

 विश्वजित, दिव्या राणे यांचा विरोधवाळपईचे आमदार तथा वनमंत्री विश्वजित राणे तसेच त्यांची पत्नी पर्येंच्या आमदार दिव्या राणे यांनी राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यास तीव्र विरोध केला आहे. हायकोर्टाचा आदेश आला त्याचवेळी सरकार या आदेशाला सुप्रिम कोर्टात आव्हान देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. राखीव व्याघ्रक्षेत्र झाल्यास अनेक निर्बंध येतील. पर्यें व वाळपई मतदारसंघातील लोकांना त्याचा फटका बसेल. अभयारण्यातील लोकांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करणे शक्य होणार नाही. लोकांवर अन्याय होईल, त्यामुळे राखीव व्याघ्रक्षेत्र नकोच अशी भूमिका या दोघांनी घेतली आहे.

गोवा फाऊंडेशन या संघटनेने  उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर राज्य सरकारने पुढील तीन महिन्यांत म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसू‌चित करावा, असा आदेश दिला होता. हा आदेश देताना हायकोर्टाने असे नमूद केले होते की,‘गेल्या ७६ वर्षात वाघांची संख्या देशात ९२ टक्क्यांनी घटली. वन नसल्यास वाघ मृत्यू पावतात आणि वाघ नसल्यास वने नष्ट होतात. वाघ वनांचे रक्षण करतात. व्याघ्र क्षेत्र अधिसूचित होणे गरजेचे आहे.’

टॅग्स :goaगोवाTigerवाघ