शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा देशातील पहिलेच रेबिजमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 15:24 IST

यंदा प्रथमच कुत्र्याने चावा घेतल्याने रेबिज होऊन मृत्युमुखी पडण्याच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही. त्या

मडगाव: यंदा प्रथमच कुत्र्याने चावा घेतल्याने रेबिज होऊन मृत्युमुखी पडण्याच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही. त्यामुळे गोवा हे देशातील पहिलेच रेबिजमुक्त राज्य होण्याच्या वाटेवर वाटचाल करत आहे. मागची पाच वर्षे मिशन रेबिज या मोहिमेखाली एक दशलक्षपेक्षा अधिक श्वानांचे लसीकरण आणि त्याचबरोबर केलेली जागृती त्यामुळेच ही किमया साध्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.2011 पासून 2017 पर्यंत गोव्यात कमी प्रमाणात का होईना पण रेबिज बाधा होऊन लोकांना मृत्यू आला होता.मात्र यंदा 30 नोव्हेंबरपर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यासंबंधात मत व्यक्त करताना मिशन रेबिजचे शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मुरुगन अप्पूपिल्लई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, लहान मुलांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे आम्हाला हे यश मिळाले असे ते म्हणाले. रेबिज रोगासंदर्भात या योजनेखाली शाळांतून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मिशन रेबिजकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2011 साली गोव्यात पाच जणांना रेबिजमुळे मृत्यू आला होता. 2012 साली हा आकडा 13 वर पोहोचला होता. 2013 साली तो खाली उतरून पाचवर आला. मात्र 2014 साली हा आकडा 15 वर पोहोचला होता. 2015 साली पाच, 2016 साली एक, तर 2017 साली दोन मृत्यूंची नोंद झाली.मिशन रेबिज ही योजना 2013 साली गोव्यातूनच सुरू झाली होती. या मोहिमेखाली लोकांमध्ये जागृती करण्याबरोबरच कुत्र्यांचे लसीकरण व निर्बिजीकरण हे उपाय हाती घेतले होते. येत्या तीन वर्षांत गोव्यातील 50 टक्के कुत्र्यांचे लसीकरण करण्यास आम्ही यशस्वी ठरू, असे पशुचिकित्सा खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. विलास नाईक यांनी सांगितले. डॉ. नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोव्यात भटके आणि पाळीव अशा प्रकारचे सुमारे एक लाख कुत्री असून मिशन रेबिज ही मोहीम गोव्यातून सुरू झाली. या मोहिमेला मिळत असलेले यश पाहून हाच मॉडेल आता इतर राज्यातही वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुत्र्यांनी चावे घेतल्यामुळे जगात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये एक तृतीयांश लोक भारतीय असल्याचे डॉ. अप्पुपिल्लई यांनी सांगितले. गोव्यात एकूण 1390 शाळांमध्ये रेबिज संदर्भात माहिती देणाऱ्या या मोहिमेखाली कार्यशाळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.