शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात डिसेंबरमध्ये फेस्टीव्हलचीच धूम, लाखो पर्यटकांना पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 13:06 IST

पूर्ण डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे सोहळे आणि फेस्टीव्हल्स गोव्यात पार पडणार आहेत. एकामागून एक फेस्टीव्हल्स आयोजित केले जाणार असून लाखो पर्यटकांसाठी हा इव्हेन्टचा महिना म्हणजे मोठी पर्वणीच आहे.

- सदगुरू पाटील

पणजी - पूर्ण डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे सोहळे आणि फेस्टीव्हल्स गोव्यात पार पडणार आहेत. एकामागून एक फेस्टीव्हल्स आयोजित केले जाणार असून लाखो पर्यटकांसाठी हा इव्हेन्टचा महिना म्हणजे मोठी पर्वणीच आहे. शासकीय पातळीवरून महोत्सवांची जय्यत तयारी सुरू आहे.

7 डिसेंबरला प्रथम फिशफेस्टीव्हल होईल. रोज त्यानिमित्ताने करमणुकीचे व सांस्कृतिक कार्यक्रम पणजीतील प्रसिद्ध बांदोडकर मैदानावर होणार आहेत. केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग हेही उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील विविध जातींचे मासे या फेस्टीव्हलमध्ये पर्यटकांना पहायला मिळतील. शिवाय गोव्यातील मच्छीमारांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेता येतील. चार दिवस हा महोत्सव चालेल.

जगात प्रसिद्ध असलेल्या सेंट झेवियर्सचे फेस्त येत्या 4 डिसेंबरला होत आहे. त्यावेळीही हजारो पर्यटक जुनेगोवेमध्ये उपस्थित असतील. सुरक्षेच्यादृष्टीने सरकारने सगळी तयारी केली आहे. पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. जगातून पर्यटक व भाविक सेंट ङोवियरच्या जात्रेसाठी येत असतात. भाविकांचे आगमन सुरू झाले आहे.

7 डिसेंबरपासून गोवा कला आणि साहित्य हा महोत्सव होणार आहे. लिटररी फेस्टीव्हल अशा नावाने हा सोहळा ओळखला जातो. देशभरातील साहित्य अकादमीने मान्यता दिलेले अनेक इंग्रजी, हिंदी, मराठी, कोंकणी साहित्यिक त्यात भाग घेतात. राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले दोनापावल हे अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अजय देवगणच्या सिंगम चित्रपटाचे शुटिंगही दोनापावल येथे झाले होते. त्याच भागात गोवा इंटरनॅशनल सेंटर असून तिथे हा महोत्सव होईल. 10 डिसेंबर्पयत तो चालेल.इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल म्हणजे ईडीएम हे सुद्धा गोव्यातील युवकांमध्ये लोकप्रिय ठरू लागले आहेत. सुमारे पन्नास हजार पर्यटक ईडीएममध्ये सहभागी होतात. येत्या 27 डिसेंबरपासून उत्तर गोव्यातील वागातोर समुद्रकिनारी ईडीएम फेस्टीव्हल होणार आहे. जोरदार संगीताच्या तालावर अखंडीतपणो पर्यटक या फेस्टीव्हलमध्ये नृत्य करतात. काहीवेळा अंमली पदार्थाचाही वापर होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच्या काळात आलेल्या आहेत.

गोव्यात 31 डिसेंबरची रात्र तर लाखो पर्यटकांकडून गाजविली जाते. देशभरातील बडे उद्योगपती, बॉलिवूडमधील कलाकार मंडळी तसेच अनेक राजकीय नेते नववर्ष साजरे करण्यासाठी यावेळीही गोव्यात येणार आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारी भागांतील सगळी तारांकित हॉटेल्स सध्या नववर्षाचे आगमन साजरे करण्यासाठी तयारी करू लागली आहेत. 30 व 31 डिसेंबर रोजी रात्री त्यानिमित्ताने गोव्यात अनेक कार्यक्रम होतील.

गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. डिसेंबर महिना तर पर्यटकांचाच असतो. नाताळ सणाचीही तयारी गोव्यात सुरू असून डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात पर्यटक नाताळचा आनंद लुटतील.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन