शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : प्रत्येक दिवशी दोन तळीरामांचे होताहेत वाहन परवाना निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 17:38 IST

दारूच्या सेवनावर कुठलेही निर्बंध नसलेल्या गोव्यात प्रतिदिन सरासरी किमान दोन वाहन चालकांचे परवाने दारू किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालवल्याच्या कारणावरुन निलंबित केले जात आहेत.

मडगाव -  दारूच्या सेवनावर कुठलेही निर्बंध नसलेल्या गोव्यात प्रतिदिन सरासरी किमान दोन वाहन चालकांचे परवाने दारू किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालवल्याच्या कारणावरुन निलंबित केले जात आहेत. जानेवारी 1 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत तब्बल 876 वाहन चालकांचे परवाने याच कारणांमुळे निलंबित केल्याची माहिती वाहतूक खात्याच्या आकडेवारीवरुन प्राप्त झाली आहे. मागील वर्षात वाहतूक नियमांची भंग केल्याची 7355 प्रकरणे नोंद झाली असून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सर्वात जास्त म्हणजे 2,303 प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी 876 वाहन चालकांचे परवाने निलंबित केले गेले आहेत. 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत 206, 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत 53, 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 215 तर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 402 वाहन चालकांचे परवाने निलंबित केले गेले आहेत.

दारू किंवा इतर अंमली पदार्थांच्या सेवन करुन गाडी चालवल्यास वाहन चालकाच्या नकळत गाडीचा वेग वाढून अपघात होऊ शकतो. 1 पेग दारू घेतली तरीही हा अंमल येऊ शकतो. अशा परिस्थितीत अपघात होऊ नयेत यासाठीच ही कारवाई केली जात असून जर कुठल्याही वाहन चालकाला आपला परवाना निलंबित करुन घ्यायचा नसेल तर त्यांनी दारू प्यायलेल्या अवस्थेत वाहन चालविणे टाळावे, असा सल्ला पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिला.

दारुच्या अंमलाखाली वाहन चालवल्याचे सिद्ध झाल्यास त्या वाहन चालकाला सहा महिन्यापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. जर दुस-यांदा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास दोन वर्षापर्यंत कैद आणि तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा त्या वाहन चालकाला होऊ शकते.

 5834 सेन्टिनल्सगोव्यात ट्रॅफिक सेन्टिनल्स या योजनेला काही नागरिकांकडून आणि राजकारण्यांकडून विरोध होत असला आणि काही ठिकाणी या सेन्टिनल्सना मारहाण करण्याच्याही घटना घडल्या असल्या तरी दिवसेंदिवस सेन्टिनल्सची संख्या वाढतच असल्याचे निदर्शनास आले आहे. गोवा वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या सेन्टिनल्स अॅपवर आतापर्यंत 5834 जणांनी आपली नोंदणी करुन घेतली आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

 

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हgoaगोवा