शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: “मनोहर पर्रीकर हे आजच्या आधुनिक गोव्याचे शिल्पकार”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 16:17 IST

Goa Election 2022: आप व तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवावे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

डिचोली:  ‘दिवंगत मनोहर पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे निर्माते आहेत. त्यांच्यानंतर प्रमोद सावंत यांनी अनेक क्षेत्रांत विकासाला चालना दिली’, असे प्रतिपादन भाजप गोवा प्रभारी व महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डिचोलीतील शेट्ये प्लाझा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राज्याच्या विकासाचा आलेख खूप मोठा आहे. काँग्रेसचेही डबल इंजिन सरकार होते. त्यांनी काहीच केले नाही. आज तृणमूल काँग्रेस, आप खोटी आश्वासने देत आहेत. तृणमूलला भुलून अनेक जण वाहत गेले. गोव्यात तृणमूलचा फॉर्म्युला चालू शकत नाही, हे लक्षात येताच अनेक जण दूर झालेत, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘मगो पक्षाला तृणमूलच्या काळ्याकुट्ट व लोकशाही मान्य नसलेल्या लोकांबरोबर जाणे महागात पडणारे आहे. आज मगोबदद्ल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर तृणमूलचा ध्येय मगोला मान्य असेल तर त्यांना जनता अजिबात मत देणार नाही’ असे फडणवीस म्हणाले.  

आप व तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवावे असे आवाहन फडणवीस यांनी केले. ‘राजकारणातून नेता अंतिम क्षणापर्यंत खुर्ची सोडत नाहीत. मात्र, राजेश पाटणेकर यांनी स्वतःहून नवा चेहरा द्या, असे आवाहन केले होते. आता मात्र त्यांनी रिंगणात उतरून योग्य निर्णय घेतला, याचे समाधान त्यांना आहे. ते मंत्री होतील’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. राजेश पाटणेकर म्हणाले,  आगामी काळात केंद्र व राज्यात भाजप विकासाला मोठी चालना देणार आहे’, असा विश्वास राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केला.  

पाच वर्षे गोव्याच्या समृद्धीची 

मागील १० वर्षे गोव्याच्या विकासाची होती. पुढील पाच वर्षे गोव्याच्या समृद्धीची असल्याने होणारी निवडणूक गोव्यात परिवर्तन घडवणारी निवडणुक आहे. त्यामुळे मतदारांनी भाजपासोबत राहण्याचे आवाहन भाजपचे गोवा प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवोली मतदार संघातील वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रात कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी भाजपाचे शिवोलीतील उमेदवार दयानंद मांद्रेकर मंडल अध्यक्ष मोहन दाभाळे तसेच इतर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी भाजमध्ये प्रवेश केला. 

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना पैशांच्या जोरावर शिवोलीतील मतदारांना विकत घेणे शक्य होणार नसून येथील मतदार भाजपा उमेदवारासोबत कायम पाठिशी राहणार, असा दावा फडणवीस यांनी केला. पेडणेतील मोपामुळे पर्यटकात वाढ होणार आहे. मोपामुळे तसेच वाढणाऱ्या पर्यटकांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतील. त्यातून नवीन गोव्याची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल होईल, असेही ते यावेळी म्हणाले. दिगंबर कामत यांचे सरकार घोटाळ्यांचे सरकार होते. स्वत:ची घरे भरण्यासाठी सत्ता हवी असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस