शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात १.३९ लाखांची अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 22:51 IST

कारकुनावर गुन्हा दाखल

पणजी: जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून म्हणून काम करणाऱ्या गौरीश केरकर यांने १.३९ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा गुन्हा पणजी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आला आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत लोकांकडून भरण्यात आलेल्या विविध स्वरूपातील शुल्काच्या रक्कमेवर ताव मारण्याचे काम त्याने चालविले होते. 

रोकड काउंटर सांभाळणारा हा गौरीश लोकांकडून घेतलेल्या पैशांच्या रीतसर पावत्या वगैरे देत होता परंतु काही काळाने संगणकातील या पावत्यांची माहितीच नष्ट करीत होता. व जमा झालेले पैसे हडप करीत होता. १ एप्रिल २०१७ पासून ३० एप्रिल २०१८  पर्यंतच्या एक वर्षाच्या कालावधीत त्याने हा घोटाळा केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी दिलीप मोरजकर यांनी पणजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची खात्यांतर्गत चौकशीही करण्यात आली होती. त्यात तो दोषी आढळल्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अजूनही तो निलंबितच आहे. तसेच नेहमी त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सक्तीची हजेरी लावावी लागत आहे. खात्यांतर्गत चौकशीत दोषी आढळल्यानंतर पोलीसात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

असा आला घोटाळा उघडकीस लोकांकडून येणारे पैसे हडप करण्याचे संशयित गौरीश केरकर यांचे तंत्र तसे वेगळेच होते. त्याने स्वत:च ते विकसित केले असावे. पैसे घेतलेल्या प्रत्येकाला तो  रीतसर पावती देत होता. परंतु काही काळानंतर संगणकावरील संपूर्ण माहिती (डेटा) तो नष्ट करीत होता. मध्यंतरी त्याला प्रतिनियुक्ती तत्वावर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयात नेमणूक करण्यात आली आणि त्यामुळेच त्याचा भांडाभोड झाला. कारण त्यावेळी त्यांच्या जागी जिल्हाधिकारी कार्यालयातील रोकड काउन्टरवर आलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या  ही अफरातफर लक्षात आली. लगेच त्याने आपल्या वरिष्ठांना कळविली आणि नंतर त्याची चौकशी सुरू झाली व तो सापडला.

टॅग्स :goaगोवाfraudधोकेबाजी