शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गोवा डेअरीच्या एमडीला दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 20:48 IST

खंडपीठाने निलंबनास स्थगिती नाकारली

पणजी: निलंबनाची कारवाई करण्यात आलेले गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांनी सहकार प्रबंधकाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले आहे. परंतु  एकसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणात सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांनी नकार दिल्यामुळे निदान सोमवारी तरी आदेशास स्थगिती मिळविण्याचे सावंत यांचे प्रयत्न फसले.

 गोवा डेअरीचे संचालक मंडळच अपात्र ठरवून व्यवस्थापकीय संचालक सावंत यांच्या निलंबनाचा आदेश सहकार प्रशासक दामोदर मोरजकर यांनी दिला होता. तसेच  सावंत यांना या प्रकरणात जबाबदार धरताना त्याची चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या आदेशाला खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. सावंत यांच्यावतीने युक्तीवाद करताना अ‍ॅड सुरेश लोटलीकर यांनी सहकार निबंधकाचा आदेश हा बेकायदेशीर असल्याचा दावा केला. सहकार कायद्याचे ते उल्लंघन असल्याचेही त्यांनी सांगितले. 

त्यावर प्रतिवाद करताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी सहकार निबंधकाचा आदेश हा गोवा सहकार कायद्यातील तरतुदींनुसारच असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार प्रकरणात प्राथमिक तपासात दोषी आढळल्यास व्यवस्थापकीय संचालकाला निलंबित करण्याचा अधिकार संचालक मंडळाला किंवा प्रशासकाला आहे, असे त्यांनी सांगितले. दुसरा मुद्दा मांडताना त्यांनी हे प्रकरण अपात्रतेसंबंधी असल्यामुळे प्रकरण एकसदस्यीय खंडपीठासमोर नव्हे तर द्वीसदस्यीय खंडपीठासमोर होणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाच्या नजरेस आणून दिले. त्यावर न्यायाधीश सरदेसाई यांनी या प्रकरणात आपल्या न्यायालात त्याची सुनावणी होणार नसल्याचे सांगितले. द्वीसदस्यीय खंडपीठासमोर ते नेण्यात आले असून मंगळवारी सुनावणीसाठीही ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, गोवा डेअरीच्या संचालक मंडळाला अपात्र ठरविल्यानंतर आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या निलंबनाचा आदेश दिल्यानंतर झालेल्या गोवा डेअरीच्या ग्रामसभेत मोठा असंतोष माजला होता. सोमवारी खंडपीठापुढे ही आव्हान याचिके गेली तेव्हा त्यावर सकाळी व संध्याकाळी अशी दोन वेळा सुनावणी झाली.

टॅग्स :goaगोवाmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाHigh Courtउच्च न्यायालय