शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कस्टम अधीक्षकाची गळफास लावून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 12:28 IST

गोव्यात कस्टम अधीक्षक पदावर असलेले विवेकानंद उर्फ विवेक गोविंद नाईक (वय 54 वर्ष ) या अधिका-याने आपल्या राहत्या घरापासून 100 मीटरच्या अंतरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. 

म्हापसा : गोव्यात कस्टम अधीक्षक पदावर असलेले विवेकानंद उर्फ विवेक गोविंद नाईक (वय 54 वर्ष ) या अधिका-याने आपल्या राहत्या घरापासून 100 मीटरच्या अंतरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार गुरुवारी (16 नोव्हेंबर) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उजेडात आला. त्यानंतर लगेच म्हापसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

सदर परिसर म्हापसा पोलीस स्थानकाच्या मागे असून जुनाट तसेच पडण्याच्या मार्गावर असलेल्या घराच्या पडवीत दोरीच्या मदतीने आत्महत्या केली. त्या घरातील मुख्य गेटचा दरवाजाला टाळे असल्याने कुंपणावरुन उडी घेऊन त्यांनी आत प्रवेश केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत अनेक लोकांनी सदर परिसरात त्याला पाहिल्याचे तेथे जमलेले लोक बोलत होते.  

मृत विवेक नाईक हा वास्को येथील दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या गुप्तचर विभागात सध्या सेवेला होता. बुधवारी रात्री त्याला ड्युटी होती, पण आपण ड्युटीवर येऊ शकत नसल्याने त्यांनी कस्टम आयुक्तांना फोनवरुन कळवलं होते, अशी माहिती घटनास्थळी दाखल झालेले सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांनी दिली. तो कार्यक्षम अधिकारी होता असेही त्यांनी सांगितले. 

पंचनामा करतेवेळी पोलिसांना त्याच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यातील एक पत्नीच्या नावे, दुसरी भावाच्या, तिसरी बहिणीच्या तर चौथी कस्टम आयुक्तांच्या नावे लिहिली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी दिली. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचा प्रकार घातपात असण्याची शक्यता डायस यांनी तुर्तात नाकारली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी अंती कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. 

विवेक हा एक उत्कृष्ठ क्रीडापटू होता. १९ वर्षाखालील गोव्याच्या क्रिकेट संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व सुद्धा केले आहे. तसेच राज्य स्तरावरील अनेक स्पर्धातून लक्षवेधी कामगिरीसुद्धा त्यांनी केली आहे. क्रिकेट बरोबर त्यांनी इतर खेळातूनही नाव कमावले होते.  

टॅग्स :Suicideआत्महत्याgoaगोवा