शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोवा - न्यायालयाने फेटाळली नगरनियोजन मंत्री सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 14:30 IST

गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याविरोधात भ्रष्टाचार संदर्भात एफआयआर नोंद करुन घ्यावा यासाठी आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रीगीस यांनी मडगावच्या सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी फेटाळून लावला

मडगाव -  गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याविरोधात भ्रष्टाचार संदर्भात एफआयआर नोंद करुन घ्यावा यासाठी आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रीगीस यांनी मडगावच्या सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी फेटाळून लावला. आमदार व मंत्री हे सार्वजनिक नोकर या व्याख्येत येतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करुन घ्यायचा असल्यास सरकारची आगाऊ परवानगी घेणो आवश्यक असते. सरदेसाई प्रकरणात अशी कुठलीही परवानगी न घेतल्याने तांत्रिकरित्या त्यांच्या विरोधात एफआयआर नोंद करुन घेता येत नाही असे न्या. देशपांडे यांनी आपल्या आदेशात म्हटले.

अॅड. रॉड्रीगीस यांनी एका ध्वनिफितीचा आधार घेत सरदेसाई यांच्या विरोधात फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. रॉड्रीगीस यांच्या दाव्याप्रमाणे, सरदेसाई यांनी काशिनाथ शेट्ये या अन्य एका आरटीआय कार्यकरत्य्ला केलेल्या फोनाची ही फीत होती. त्यात औद्योगिक महामंडळाच्या वेर्णा वसाहतीत खुल्या जागेचे प्लॉटमध्ये रुपांतर केल्याचे या संभाषणात म्हटले असून या प्लॉटसाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला दीड कोटींची ऑफर दिली होती असे म्हटल्याचे या तक्रारीत म्हटले होते. हे कारस्थान उघडकीस आणण्यासाठी सरदेसाई व इतरांवर गुन्हा नोंद करुन चौकशी करावी असे या तक्रारीत म्हटले होते.

फातोर्डा पोलिसांनी एफआयआर दाखल न केल्यामुळे रॉड्रीगीस यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हा नोंद करायचा असल्यास सरकारची आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे असा दावा खास सरकारी वकील साईश महांबरे यांनी केला होता. न्यायालयाने महांबरे यांचा हा दावा ग्राहय़ धरला.  सत्र न्यायालयाच्या या आदेशाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार असे अॅड. रॉड्रीगीस यांनी नंतर प्रसार माध्यमांना सांगितले.

 

टॅग्स :Courtन्यायालय