शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नोव्हेंबरमध्ये कोविडचे ८५ बळी, बहुतेक ज्येष्ठ नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 12:46 IST

CoronaVirus in Goa: नोव्हेंबर हा एकमेव असा महिना आहे, जिथे अजूनपर्यंत तीन दिवस असे आले, की त्या तीन दिवसांत एकही बळी गेला नाही.

पणजी : ओगस्ट किंवा सप्टेंबर व ओक्टोबर महिन्याच्याही तुलनेत नोव्हेंबरमध्ये कोविडमुळे कमी बळी गेले पण संख्या एकदम कमी नाही. अजून नोव्हेंबर महिना पूर्ण होण्यास सहा दिवस बाकी आहेत. गेल्या चोवीस दिवसांत नोव्हेंबरमध्ये एकूण ८५ व्यक्तींचे कोविडने बळी घेतले आहेत. यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षांवरील रुग्णांचा समावेश आहे.

सप्टेंबर किंवा ओक्टोबरमध्ये व कोविडमुळे खूपच बळी गेले.  नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही जास्त बळी गेले. मात्र दुसऱ््या पंधरवड्यात संख्या खाली आली आहे. १ नोव्हेंबर रोजी कोविडमुळे पाचजण दगावले होते. त्यातही तीन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. पुन्हा २ नोव्हेंबर रोजी सातजणांचे कोविडमुळे निधन झाले होते. त्यातही पाच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. शिवाय दोघे ५७ व ५९ वर्षे वयाचे होते. १७ नोव्हेंबर रोजी कोविडने चौघांचा जीव घेतला. त्यात दोघे ज्येष्ठ नागरिक होते व दोघे पंचावन्नहून जास्त वयाचे आहेत.

नोव्हेंबर हा एकमेव असा महिना आहे, जिथे अजूनपर्यंत तीन दिवस असे आले, की त्या तीन दिवसांत एकही बळी गेला नाही. हे तीन दिवस सलग आले नाहीत. २३ नोव्हेंबर रोजी गोव्यात कोविडमुळे एकाचेही निधन झाले नाही. १९ नोव्हेंबर रोजीही गोव्यात कोविडमुळे कुणी दगावले नाही. १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रत्येकी फक्त एकाचाच बळी गेला. १२ नोव्हेंबर रोजीही राज्यात कोविडमुळे कुणाचे निधन झाले नाही.

कोविडची लक्षणे दिसल्यानंतरही लोक पूर्वी घरीच राहत होते. तपासणीही करून घेत नव्हते व गोळ्याही घेत नव्हते. शेवटच्या क्षणी इस्पितळात धाव घेत होते. अशा रुग्णांचेच जास्त बळी गेले. मात्र आता स्थिती बदलू लागली आहे. आता रुग्ण अगोदरच उपचार सुरू करतात. चाचणी करून घेतात व डोक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज पडल्यास अगोदरच इस्पितळात येतात. यामुळे बळींचे प्रमाण थोडे खाली आले आहे. ज्यांचे वय जास्त आहे व ज्यांना अन्य कसले तरी गंभीर आजार आहेत, त्यांनी कोविडबाबत अधिक सतर्क राहणे व काळजी घेणे गरजेचे ठरते.५६ ज्येष्ठ नागरिक दगावले गेल्या चोवीस दिवसांत एकूण ५६ ज्येष्ठ नागरिकांचा जीव कोविडने घेतला. साठ, सत्तर व ऐंशी वर्षांवरील हे नागरिक आहेत. बहुतेकजण बांबोळी येथील गोमेको इस्पितळात उपचार घेताना मरण पावले. काहीजण मडगावच्या ईएसआय इस्पितळात मरण पावले. चाळीशीच्या वयोगटातील एक-दोघेजण गेल्या चोवीस तासांत कोविडमुळे मरण पावले आहेत. त्यांना अन्य आजारही होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा