शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : गोव्यात ‘कोरोना’नं गृह कर्ज घेतलेल्या सरकारी कर्मचा-यांवर ओढवलं संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 17:05 IST

गृह कर्ज योजना अचानक बंद करुन सरकारने या कर्मचा-यांना बँकाच्या वाढीव व्याजदराच्या खाईत लोटले आहे. घर बांधण्यासाठी कर्ज घेतलेल्या ५ हजार कर्मचा-यांवर यामुळे संकट ओढवले आहे. 

पणजी : ‘कोरोना’मुळे झालेले लॉकडाऊन व त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम गोव्यातील सरकारी कर्मचा-यांच्याही मुळावर आला आहे. सरकारी कर्मचा-यांसाठी असलेली गृह कर्ज योजना अचानक बंद करुन सरकारने या कर्मचा-यांना बँकाच्या वाढीव व्याजदराच्या खाईत लोटले आहे. घर बांधण्यासाठी कर्ज घेतलेल्या ५ हजार कर्मचा-यांवर यामुळे संकट ओढवले आहे. 

सरकारी कर्मचा-यांना घर बांधणीसाठीची कर्ज योजना बंद करण्यात आल्याने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यास आक्षेप घेत सरकारने निर्णय मागे घेऊन ही योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिले आहे. सरकारच्या ज्या ५ हजार कर्मचा-यांनी घर बांधणीसाठी कर्ज घेतलेले आहे आणि भविष्यात जे हजारो कर्मचारी स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न बाळगून हे कर्ज घेण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यावर हा अन्याय असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. 

कामत म्हणतात की, सरकारी खात्यात साधा कारकून असलेल्या कर्मचा-याने जर घर बांधणीसाठी २४ लाख रुपये कर्ज घेतले तर एरव्ही त्याला दरमहा १२ हजार रुपये हप्ता फेडावा लागत होता मात्र आता त्याला बँकेत वाढीव व्याज दराने दुप्पट २४ हजार रुपये हप्ता भरावा लागेल. १९८७ साली ही योजना आणली त्यानंतर एकाही सरकारने या योजनेला हात लावला नाही. मात्र आता ती बंदच करुन सरकारी कर्मचा-यांना मोठा धक्का दिलेला आहे. सरकारी कर्मचा-यांना या सवलतीपासून वंचित करण्यात आल्याने फार मोठा परिणाम या घटकांवर होणार आहे.हप्ते भरुन जी काही बचत रहात होती त्यातून कर्मचारी मुलाबाळांच्या शिक्षणाचा, घरातील आजारी व्यक्तीच्या औषधपाण्याचा खर्च करीत असत ते वंचित होतील, असे कामत या पत्रात म्हणतात. दरम्यान, राज्यात सुमारे ६५ हजार सरकारी कर्मचारी आहेत. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर स्वत:चे चांगले घर असावे असे स्वप्न प्रत्येकजण बाळगून असतो. परंतु ही स्वप्ने आता धुळीस मिळाली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या