शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

Goa: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या कमी, महागाई आणि अपप्रचाराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 18:12 IST

Goa: राज्यात यंदा नवीन वर्षाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी जाणवली. गेल्या वर्षी २०२२ च्या तुलनेत यंदा देश विदेशातील पर्यटकांची संख्या कमी आहे.

- नारायण गावस  पणजी - राज्यात यंदा नवीन वर्षाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी जाणवली. गेल्या वर्षी २०२२ च्या तुलनेत यंदा देश विदेशातील पर्यटकांची संख्या कमी आहे. गाेव्यात पर्यटनाविषयी केली जाणारी बदनामी, वाढत्या कोराेनाच्या तक्रारी, तसेच वाढती महागाईचा, विदेशात होत असलेली युद्धे याचा फटका यंदा पर्यटन व्यावसायावर बसला असे काही हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटनाशी निघडीत व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

एरव्ही डिसेंबरमध्ये नवीन वर्ष नाताळाला राज्यात पर्यटकांची माेठ्या प्रमाणात गर्दी असते. नाताळ नंतर पूर्ण आठवडा नवीन वर्ष येईपर्यंत पर्यटक राज्यात राहतात. यंदा डिसेंबरचा शेवटच्या आठवड्यात तेवढी पर्यटकांची गर्दी जाणवली नाही. पर्यटक आले पण जास्त प्रमाणात आले नाही. राज्यात जी काही वर्षापूर्वी नवीन वर्षाची क्रेझ होती. ती यंदा पहायला मिळाली नाही. जे कुटुंबासाेबत पर्यटक येत होते. त्यांच्यामध्ये कुठेतरी कमतरता जाणवली आहे. त्यामुळे यंदा पर्यटन व्यावसायाशी निघडीत असलेल्या काही व्यावसायिकांना फटका बसला.

काेरोना व अपप्रचाराचा फटका : जॉन डिकोस्टाराज्यात पुन्हा कोराेना रुग्ण वाढत आहे. देशभर सध्या कोराेनाचे रुग्ण वाढत असल्याने पर्यटक राज्यात येणे कमी केले. २०२० व २०२१ मध्ये कोराेनामुळे राज्यात पर्यटकांची संख्या कमी होती. नंतर २०२२ मध्ये पर्यटकांनी माेठी गर्दी केली होती. सर्व हॉटेल भरले होते. पण यंदा पर्यटकांची पुन्हा कमतरता जाणवली. तसेच राज्याच्या पर्यटना विषयी काही लाेकांनी नकारात्मक प्रसिद्धी केली आहे. पर्यटकांवर हाेत असलेले हल्ले त्यांची लुबाडणूक याला कारणीभूत आहे, असे वागातोर येथील हॉटेल व्यावसायिक जॉन डिकाेस्टा यांनी सांगितले.

पुढील दिवसात पर्यटक वाढणार : निलेश शाहगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या थोडी कमी आहे. सध्या रशिया युक्रेन तसेच अन्य देशात होत असलेल्या युद्धामुळे विदेशी पर्यटकांची संख्या कमी आहे. पण पुढील काही दिवसात राज्यात पर्यटक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आता लग्न साेहळ्यासाठी हॉटेल बुकींग झाले आहेत, असे टुर ॲण्ड ट्रव्हल गोवा असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शाह यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटनNew Yearनववर्ष