शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: लोकप्रतिनिधी म्हणून या कार्यकाळात स्वच्छ व सुंदर प्रियोळ ला प्राधान्य - मंत्री गोविंद गावडे

By आप्पा बुवा | Updated: June 12, 2023 19:37 IST

Goa: कचरा निर्मूलनावर आज कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. हे रुपये खरे तर नागरिकांच्या हक्काचे आहेत जे इतर विकासात्मक कामाला वापरायला मिळतील  जर कचराच तयार नाही झाला तर. असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले .

फोंडा - स्वच्छ व सुंदर प्रियोळ ही संकल्पना घेऊन या कार्यकाळात पुढे जात असून, आपला परिसर स्वच्छ ठेवायची जबाबदारी ही एकट्या सरकारची नसून, प्रत्येकाने आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणार अशी शपथ घ्यायला हवी. पाश्चात्य देशात स्वच्छतेवर एवढा कटाक्ष असतो मग आम्ही भारतीय त्यात मागे का राहूया. कचरा निर्मूलनावर आज कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. हे रुपये खरे तर नागरिकांच्या हक्काचे आहेत जे इतर विकासात्मक कामाला वापरायला मिळतील  जर कचराच तयार नाही झाला तर. असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले .

वेलिंग पंचायतीच्या वतीने बायोगास प्रकल्प सोमवारी त्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच हर्षा गावडे ,पंचायतीचे उपसंचालक प्रसिद्ध नाईक, गटविकास अधिकारी अश्विन देसाई, उपसरपंच रुपेश नाईक, इतर पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की उघड्यावर कचरा टाकण्यावर अंकुश यावा म्हणून सरकारने नवीन कायदा चालीस लावायचे ठरवले असून ह्या कायद्याच्या अंतर्गत एक पंच सदस्य सुद्धा कचरा टाकणाऱ्या वर कारवाई करू शकतो. नागरीक सुसंस्कारी झाले असते तर सदरचा कायदा लावायची पाळी सरकारवर आलीच नसती.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात टाकण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या संदर्भात ते म्हणाले की ज्यावेळी गृहमंत्री अमित शहा आले होते त्यावेळेस सगळा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. परंतु काही  दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा जागोजागी दारूच्या बाटल्यांचे खच पडलेले असून, आम्ही पोलिसांना ह्या बाबतीत सक्त होण्याचे आदेश दिलेले आहेत. यापुढे सदर परिसरात दारूच्या बाटल्या टाकणाऱ्या लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील.

शिक्षित लोकांवर ताशेरे ओडताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांना आपल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हे ज्ञान असते .परंतु जे स्वतःला शिकलेले आहेत असे समजतात ते शहरी भागातील लोक मात्र मिळेल तिकडे कचरा टाकून परिसर विद्रूप करण्याचे काम करतात.उघड्यावर कचरा टाकताना निदान आपण घेतलेल्या शिक्षणाचा तरी आठवण केली तरी खूप होईल.

कचऱ्याच्या बाबतीत लोक करत असलेली बेजबाबदारपणा पाहता सरकारचा सुद्धा सहनशक्ती संपलेली असून आता सरकार सुद्धा कठोर होणार आहे.

टॅग्स :goaगोवा