शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:28 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असून राज्यात नेतृत्व बदल करणे अटळ आहे

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असून राज्यात नेतृत्व बदल करणे अटळ आहे. त्यामुळे भाजपमध्ये नवा नेता निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या असून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पर्रीकर यांनी यापूर्वीच राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. राज्यात सरकार भाजपचेच असावे व मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा वगैरे देण्याचे खेळ आता खेळू नयेत यावर भाजपमध्ये एकमत आहे. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा विधानसभा सभागृहात भाजपच्या आमदारांची संख्या वाढावी म्हणून पुढाकार घेतला आहे. भाजपच्या गाभा समितीच्या (कोअर टीम) काही मोजक्याच सदस्यांची एक गुप्त बैठक शनिवारी पार पडली. तीत खासदार नरेंद्र सावईकर सहभागी होते.मगोपचे नेते असलेले सुदिन ढवळीकर मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा सोपविण्यास गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांचा आक्षेप आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली. ढवळीकर यांना मुख्यमंत्री करत असाल तर खुशाल करा पण मी मंत्रीपद स्वीकारणार नाही असे सरदेसाई यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपमध्ये विलीन केल्यास तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्याच्यादृष्टीने आम्ही श्रेष्ठींशी चर्चा करू, असे पदाधिकाºयांनी सरदेसाई यांना सांगितले. या विषयावर भाजपच्या निरीक्षकांसमोर रविवारी चर्चा होणार आहे....तर विजय सरदेसाई मुख्यमंत्रीराज्यात सत्ताकारणाच्या स्पर्धेत गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा, मंत्री विजय सरदेसाई आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे (मगोप) नेते आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यातच मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपमध्ये विलिन केला तर सरदेसाई राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात.मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखलमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शनिवारी दिल्लीत आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये दाखल केले आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो यांनी शनिवारी सकाळी त्यांची इस्पितळात भेट घेतली. पर्रीकर यांच्याकडे २६ खाती आहेत. त्यापैकी महत्त्वाची अतिरिक्त खाती लवकरच इतर मंत्र्यांना देणार असल्याचे समजते.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर