शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

...म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंत्रालयात आले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:43 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तरी पर्वरी येथील मंत्रालयात आले नव्हते. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन गेल्या गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री पर्रीकर  हे शुक्रवारी मंत्रालयात येऊ शकले नाहीत.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तरी पर्वरी येथील मंत्रालयात आले नव्हते. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन गेल्या गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री पर्रीकर  हे शुक्रवारी मंत्रालयात येऊ शकले नाहीत. ते सोमवारी सकाळी मंत्रालयात येतील असे सांगितले गेले तरी, प्रत्यक्षात ते सकाळी आले नाहीत. गोव्यात असतानाही मंत्रालयात येण्यापासून मुख्यमंत्री कधीच दूर राहिले नव्हते. पण यावेळी त्यांना आरोग्याच्या कारणास्तव काळजी घ्यावी लागत आहे. मात्र मुख्यमंत्री गोव्यात असल्याने सर्व राजकीय अफवा तूर्त थांबल्या आहेत.

मुंबईतील लिलावती इस्पितळात उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मग अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते. तिथे आठवडाभराच्या उपचारानंतर मुख्यमंत्री गोव्यात आले व प्रथम तीन दिवस त्यांनी विश्रांती घेतली. मुख्यमंत्री शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस दोनापावल येथील आपल्या निवासस्थानीच राहीले. मुख्यमंत्री थकलेले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणत्याच शासकीय फाईल्स पाठविल्या गेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी विश्रांती घेऊ द्या, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनीही घेतली.

शनिवार व रविवारी सुटीचेच दिवस असतात. सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयात येतील असे अन्य मंत्र्यांना अपेक्षित होते पण ते येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री घराकडूनच तूर्त शासकीय काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेहून परतल्यानंतर मुख्यमंत्री कोणत्याच खात्याची किंवा वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊ शकलेले नाही. सोमवारी दुपारनंतर जर ते मंत्रालयात आले तर बैठक घेतील.

मंत्रिमंडळातील अन्य दोन ज्येष्ठ मंत्री गेले काही महिने गोव्याबाहेरच उपचारांसाठी आहेत. नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर  हे न्यूयॉर्कमधील ज्या स्लोन केट्टरींग फाऊंडेशन इस्पितळात उपचार घेत होते, त्याच इस्पितळात मंत्री डिसोझा हेही उपचार घेत आहेत. या शिवाय गोव्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले तीन दिवस मुंबईतील एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. डिसोझा व मडकईकर या दोन्ही मंत्र्यांकडून एकूण सहा खात्यांचा कारभार सध्या मुख्यमंत्रीच सांभाळत आहेत. या शिवाय मुख्यमंत्र्यांकडे स्वत:ची आणखी 20-22 खाती आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा