शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा कार्निवल १० फेब्रुवारीपासून, शिगमोत्सव २६ मार्चपासून

By किशोर कुबल | Updated: January 19, 2024 20:03 IST

शिवजयंतीसाठी पालिकांना ५ लाख, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले जाहीर

पणजी : राज्यात कार्निव्हल १० फेब्रुवारीपासून, शिगमोत्सव २६ मार्चपासून सुरु होणार असून विविध शहरांमध्ये चित्ररथ मिरवणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवजयंतीसाठी पालिकांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील.

पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अधिक माहिती देताना असे सांगितले कि,‘ तारखा जाहीर केल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर झाल्यास आयोजकांना आचारसंहितेचे पालन करावे लागेल.’ पर्यटन खात्याने काल सर्व संबंधित पालिका, पणजी महापालिकेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कार्निवलची ‘किंग मोमो’ची प्रमुख मिरवणूक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या आदल्या दिवशी ९ रोजी पर्वरी, ११ रोजी मडगांव, १२ रोजी वास्को आणि १३ रोजी म्हापसा येथे कार्निवल मिरवणुका होतील.

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या पूर्तीनिमित्त डिचोली येथे शिवजयंतीचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे. त्याआधी १६ ते १९ या कालावधीत पणजी, मडगांव, म्हापसा, मुरगांव, फोंडा व साखळी या सहा ठिकाणी शिवजयंती होईल. यासाठी सरकार पणजी महापालिका तसेच इतर संबंधित पालिकांना प्रत्येकी ५ लाख रुपये एकरकमी निधी देणार आहे. २६ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत राज्यात एकूण १८ ठिकाणी शिगमोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. २६ रोजी फोंडा येथे प्रमुख चित्ररथ व रोमटामेळ मिरवणूक होणार आहे. पणजी, म्हापसा, मडगाव आणि वास्को येथेही शिगमोत्सव मिरवणुका होतील.

स्टुपा स्पोर्ट्स अॅनालिटिक्सशी करार!दरम्यान, पर्यटन खात्याने काल आज पुढील दोन  वर्षांसाठी स्टुपा स्पोर्ट्स अॅनालिटिक्सशी कराराची घोषणा केली. खात्याच्या उच्चाधिकार समितीच्या  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ताज हॉटेलच्या एनओसीच्या अधीन राहून सिकेरी बिगर व्यावसायिक कार्निव्हल महोत्सव आयोजित करण्यास समितीने मान्यता दिली. इंग्लंडशी पर्यटन आणि इतर कामांसाठीच्या धोरणात्मक भागीदारीचा मुद्दाही या बैठकीत चर्चेसाठी आला. भारतीय उच्चायुक्तालयाने यासंदर्भात गोवा सरकारला पत्र लिहिले होते. समितीने या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.