गोवा बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या सायंकाळी ५.३० वाजता
By किशोर कुबल | Published: May 14, 2024 01:21 PM2024-05-14T13:21:48+5:302024-05-14T13:21:57+5:30
गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा १ ते २३ एप्रिल या कालावधीत झाली होती. ३१ केंद्रांवर एकूण १९,५७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
पणजी : गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी १५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर केला जाणार आहे.
मंडळाचे चेअरमन भगिरथ शेट्ये यांनी ही माहिती दिली.
गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा १ ते २३ एप्रिल या कालावधीत झाली होती. ३१ केंद्रांवर एकूण १९,५७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ९,७५७ मुलगे व ९,८१६ मुली होत्या पैकी ९७४३ मुलगे व ९८१४ मुलींनी परीक्षा दिली. २४२ रिपीटर्स आहेत. तर खाजगी/आयटीआय दहावी समकक्षवाले ३८५ परीक्षार्थी आहेत.
गेल्या वर्षी २०२३ मध्ये २०,४७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.