शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

गोव्यातही भाजपला बसतेय बंडखोरीची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 06:21 IST

गटबाजी करत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाविरुद्ध असंतोष

पणजी : काँग्रेसमधून आमदारांना फोडून भाजपमध्ये आणले जात असल्याने व भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दिवंगत आमदारांच्या मुलांना थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे तिकीट दिले जात असल्याने गोव्यातील भाजपमध्येही नेते, प्रमुख कार्यकर्ते यांच्यात बंडखोरीची भावना निर्माण झाली आहे. काहीजणांनी उघड बंड केले तर काहीजणांनी छुप्या पद्धतीने गटबाजी करत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाविरुद्ध असंतोष व्यक्त केला आहे.

दयानंद सोपटे या काँग्रेस आमदाराला भाजपने आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडले व त्यामुळे भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेतेव माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बंडाची भूमिका घेतली. त्यांनी गोवा प्रदेश भाजपच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत जोरदार असे प्रहार जाहीरपणे केले. तीन महिने त्यांनी जाहीरपणे भाजपला प्रश्न विचारत आपण प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवीन असे जाहीर केले. शेवटी भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी पार्सेकर यांच्यासोबत अनेक बैठका घेऊन त्यांचे मन वळविले.

सोपटे यांच्यासोबतच सुभाष शिरोडकर या काँग्रेस आमदारालाही भाजपने राजीनामा देण्यास भाग पाडून आपल्या पक्षात घेतले व यामुळे भाजपचे नेते तथा माजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी बंड करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. ते आता शिरोडा मतदारसंघात होत असलेली विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवत आहेत.

म्हापसा मतदारसंघाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाले. म्हापसा या रिक्त मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक आली. सध्या प्रचार काम सुरू आहे. त्या पोटनिवडणुकीत भाजपने डिसोझा यांचे पुत्र जोशुआ यांना तिकीट दिले. यामुळे माजी नगराध्यक्ष व वीस वर्षे भाजपमध्ये घालविलेले सुधीर कांदोळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ते भाजपमधून बाहेर आले व त्यांनी नुकतेच काँग्रेस पक्षाचे तिकीट स्वीकारले.उत्पल यांच्या उमेदवारीने कुंकळयेकर नाराजपणजी मतदारसंघही माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झाला. तिथे पुन्हा पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना तिकीट देण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर व त्यांचे सहकारी अस्वस्थ आहेत.च्अलीकडेच भाजपने मगो पक्षात फूट पाडली व मगोपचे दोन आमदार बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांना भाजपमध्ये आणले. यामुळे गेली ४० वर्षे भाजपचे काम करत असलेले माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.