शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक

By पंकज शेट्ये | Updated: January 6, 2024 16:16 IST

हुंड्यासाठी सिलिंडर स्फोट घडवून दोघींचा जीव घेतल्याचा ठपका

वास्को: ४८ दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरला गळती होऊन झालेल्या स्फोटात मृत पावलेल्या गर्भवती शिवानी रजावत (वय २६) व तिची आई जयदेवी चव्हाण यांच्या प्रकरणात वास्को पोलीसांनी शिवानीचा पती अनुरागसिंग रजावत विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला शुक्रवारी (दि.५) उशिरा रात्री अटक केली. काही दिवसापूर्वी पोलीसांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात हुंडाबळीचा (भादस ३०४ बी) गुन्हा नोंद करून त्याप्रकरणात चौकशीला सुरुवात केली होती. शुक्रवारी पोलीसांनी अनुरागसिंग विरुद्ध शिवानी आणि तिची आई जयदेवी चव्हाणचा खून केल्याच्या आरोपाखाली ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.१८ नोव्हेंबरला सकाळी तो स्फोट झाला होता. नवेवाडे येथील जय संतोषी माता मंदिरामागील नील पार्वती इमारतीच्या पहील्या मजल्यावर शिवानी राजावत तिचे पती अनुरागसिंग आणि काही दिवसापूर्वी तेथे आलेली तिची आई जयदेवी सोबत राहायची. गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर शुभमसिंग चव्हाण यांनी त्याची बहिण आणि आईच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांनी बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांचा षडयंत्र रचून त्यांची हत्या केल्याचा आरोप करून त्याबाबत लेखी तक्रार पोलीसांना दिली होती.

शिवानी आणि जयदेवी यांची हत्या शिवानीचे पती अनुरागसिंग यांनी केल्याचा दाट संशय शुभमने व्यक्त केला होता. हुंड्याच्या मुद्यावरून आणि अन्य विषयावरून बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांची हत्या केल्याचा संशय शुभमसिंग यांनी व्यक्त केला होता. शिवानीचा मृत्यू विवाहाच्या सात वर्षाच्या आत झाल्याने मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी त्याप्रकरणात चौकशी करित होते तर जयदेवीच्या मृत्यू प्रकरणात वास्को पोलीस चौकशी करित आहेत. शिवानीच्या मृत्यू प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून नंतर त्याचा अहवाल पोलीसांना सादर केला. तसेच त्यांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे योग्य चौकशी करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्यानंतर पोलीसांनी चौकशी करून २३ डिसेंबरला शिवानीच्या मृत्यू प्रकरणात तिचा पती अनुरागसिंग रजावत विरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध भादस ३०४ बी कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.

शुक्रवारी उशिरा रात्री पोलीसांनी शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात अनुरागसिंग रजावत विरुद्ध भादस ३०२ हा खूनाचा गुन्हा नोंद केल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. शिवानी आणि जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशीवेळी अनुरागसिंग रजावत योग्यरित्या सहकार्य करत नसल्याने त्याच्यावर कारवाई करून त्याला शुक्रवारी उशिरा रात्री अटक केल्याचे पोलीस निरीक्षक नायक यांनी सांगितले. तसेच शिवानीच्या मृत्यू प्रकरणात अनुरागसिंग रजावत याच्याबरोबरच त्याची आई (शिवानीची सासू) साधनासिंग रजावत हीच्याविरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवून भादस ३०४ बी कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या खूनाच्या प्रकरणात अटक केलेला अनुरागसिंग रजावत हा भारतीय नौदलाचा कर्मचारी असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.

टॅग्स :goaगोवा