शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

गोवा आणि महाराष्ट्र सांस्कृतिक जडणघडणीत देशात मॉडल म्हणून काम करतील: सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 20:27 IST

गोवा आणि महाराष्ट्र सांस्कृतिक सेल स्थापन करणार

फोंडा: गोवा व महाराष्ट्र यांच्यामधल्या सांस्कृतिक दुव्यासंबंधी आमची मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे. संस्कृतीत जडणघडणीत ही दोन्ही राज्ये देशात मॉडेल म्हणून काम करतील. पथदर्शी म्हणून आदर्श निर्माण करतील. गोवा व महाराष्ट्र सांस्कृतिक सेलची स्थापना करण्याचा आमचा मानस आहे. त्याजोगे आम्ही आमची नाट्य संस्कृती जगात अजरामर करू.' असा विश्वास महाराष्ट्राचे कला व संस्कृती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यंदा फोंड्यात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय गोखले, कला व संस्कृती विभागाचे उपसचिव विजय थोरात, कला व संस्कृती खात्याचे संचालक विभीषण चवरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. गोव्यातील रुद्रेश्वर संस्थेने सादर केलेले पालशेतची विहीर हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम आल्याने परंपरेचा मान म्हणून यंदा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गोव्यात होत आहे.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की 'संस्थेला किंवा कलाकाराला पुरस्कार प्राप्त होतो त्यावेळी त्याच्यावर मोठी जबाबदारी येते. येणाऱ्या पिढीसमोर आदर्श निर्माण करतानाच काल काय केले त्यापेक्षा उत्तुंग सादर करण्याचे आव्हान पेलावे लागते. कोणता देश किती धनसंपन्न आहे यावरून त्या देशाचे मूल्यांकन करण्याची मानसिकता चुकीची आहे. कारण धनाने संसाधनाची व्यवस्था करता येते परंतु मनाच्या समाधानाचे मूल्यांकन करताना धनापेक्षा 'हॅपीनेस इंडेक्स' महत्त्वाचा ठरतो आणि तो इंडेक्स फक्त भौतिक साधनातून निर्माण होत नाही,तर सांस्कृतिक संचिता मधूनच निर्माण होत असतो. मराठी म्हणजे महाराष्ट्र व गोवा हे समीकरण जुळवताना इथे असलेल्या कलाकारांना योग्य ते व्यासपीठ निर्माण करायचे आहे. त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न होत राहणार आहे.गोव्याला नाटकाची फार मोठी परंपरा आहे. नाट्यवेड्या माणसाच्या बाबतीत गोवा देशात पहिल्या पाचात येईल, एवढे नाट्यरसिक ह्या पवित्र मातीत आहेत .गोव्यात खेडोपाडी अजूनही असंख्य नाटके होतात. पोर्तुगीजांच्या राजवटीत ह्याच नाटकानी मनोरंजन बाजूला ठेवून देश प्रेमाची चिंगारी पेटवण्याचे काम केले. नाटकाच्या विरतेच्या संघर्षातून पोर्तुगीज सत्ता नष्ट करण्याची इच्छा गोवेकरी जनतेत आला. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारgoaगोवा