शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच 4 चार्टर विमाने रद्द, व्यावसायिक चिंतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:23 IST

पर्यटन हंगामाच्या सुरवातीलाच चार चार्टर विमाने रद्द झाल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन उद्योगांशी संबंधित अन्य घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

पणजी : पर्यटन हंगामाच्या सुरवातीलाच चार चार्टर विमाने रद्द झाल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन उद्योगांशी संबंधित अन्य घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षीच्या पर्यटन हंगामाच्या तुलनेत यंदा विदेशातून पर्यटकांना घेऊन येणा-या चार्टर विमानांची संख्या कमी असेल, असा होरा आधीच व्यावसायिकांनी बांधला होता. हंगामाच्या प्रारंभीच त्याची प्रचिती आली. गेल्या महिन्यात ३0 रोजी एक चार्टर विमान रद्द झाले तर चालू महिन्यात १८ चार्टर विमाने येणार होती त्यातील ३ रद्द झाली. महिनाअखेरपर्यंत आता केवळ १५ चार्टर विमानेच येतील.

टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवाचे अध्यक्ष सावियो मेसियश यांचे असे म्हणणे आहे की, इजिप्त आणि तुर्कीकडे पर्यटक वळू लागले आहे कारण गोव्यापेक्षा पर्यटकांना तेथे सफर करणे स्वस्त पडते. भौगोलिक व राजकीय कारणास्तव गेली काही वर्षे इजिप्तकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती परंतु आता ते या देशाकडे वळू लागले आहेत. गोवा सरकारने चार्टर विमानांना शक्य तेवढ्या अधिक सवलती द्यायला हव्यात, अशी मागणी आम्ही नेहमीच करीत असतो. परंतु सरकारकडून याबाबतीत काही प्रतिसाद मिळत नाही.

अन्य एका पर्यटन व्यावसायिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिएतनाम आणि थायलँड या देशांमध्येही पर्यटन बहरु लागले आहे त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होत आहे. शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी पर्यटक घटल्यास त्याचा मोठा परिणाम शॅक व्यवसायावरही होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, यंदा सरकारने शुल्क ५ हजार रुपयांनी वाढविले आहे. ही वाढ धोरणानुसार असली तरी व्यावसायिकांना तशी परवडत नाही. १८ बाय ८ मिटर जागेसाठी गेल्यावर्षी ६0 हजार शुल्क पर्यटन खात्याने घेतले होते. यंदा ५ हजार रुपयांनी ते वाढविण्यात आले आहे. आधीच व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे त्यात पर्यटक न फिरकल्यास त्याचा मोठा आर्थिक परिणाम व्यवसायावर होईल. 

पर्यटन खात्याकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी पर्यटक हंगामात ९८१ चार्टर विमाने आली आणि त्याव्दारे २ लाख ४७ हजार ३६५ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यात रशियन पर्यटकांचा भरणा जास्त होता. इंग्लंड, युक्रेन, कझाकीस्तानमधूनही चार्टर विमाने येतात.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन