शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

गोव्यात 15 दिवसांमध्ये  2 हजार 300 रुग्णांची कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 13:01 IST

राज्यात कोविड चाचण्यांचे अहवाल उशिरा येतात ही खूप चिंतेची गोष्ट आहे. लोकांत त्याविषयी संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे.

पणजी - कोविड इस्पितळात किंवा कोविड निगा केंद्रात जे कोविडग्रस्त दाखल होत आहेत, त्यापैकी जे 2 हजार 300 कोविडग्रस्त गेल्या महिनाभरात बरे झाले, त्यापैकी किमान 95 टक्के व्यक्तींचा वयोगट हा पन्नासर्पयत आहे. काहीजणांचा साठर्पयतही आहे. एकंदरीत ज्यांचे वय जास्त झालेले नाही व ज्यांना अन्य कसला गंभीर किंवा मोठा आजार नाही ते कोविडवर लवकर व यशस्वीपणो मात करू शकतात हे स्पष्ट होत आहे.राज्यात कोविड चाचण्यांचे अहवाल उशिरा येतात ही खूप चिंतेची गोष्ट आहे. लोकांत त्याविषयी संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे. कोविडग्रस्त आजारातून बरे होण्याचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांत झपाटय़ाने वाढले असे आरोग्य खात्याच्या बुलेटिनची आकडेवारी दाखवून देते. अगोदर साठ ते सत्तर एवढेच कोविडग्रस्त रोज आजारातून बरे झाल्याचे दाखविले जात होते. आता एखाद्याला सलग दहा दिवस जर कोविडची कोणतीही लक्षणो दिसत नसतील तर त्यास कोविडमुक्त झाल्याचे जाहीर केले जाते व घरी पाठवले जाते. त्यापैकी एक किंवा दोघेजण घरी गेल्यानंतर जेव्हा खासगी प्रयोगशाळेतून चाचणी करून घेतली गेली तेव्हा पुन्हा कोविड पॉङिाटीव ग्रस्त आढळले असे देखील निष्पन्न झाले आहे. मात्र या सगळ्य़ामध्येही समाधानाची गोष्ट म्हणजे पन्नास ते साठ वयाचे शेकडो कोविडग्रस्त आतार्पयत आजारातून बरे झाले आहेत. तिस ते पन्नास वयोगटातील कोविडग्रस्त आजारातून बरे झाल्याची अनेक उदाहरणो आहेत. पन्नाशीहून जास्त वयाचे काही कोविडग्रस्त अजून उपचार घेत आहेत. कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस हे 49 वर्षे वयाचे आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अनेक पोलिस, काही वकील, आरोग्य खात्याने वीस तरी कर्मचारी, काही डॉक्टर्स वगैरे कोविडग्रस्त झाले व त्यापैकी बहुतेकजण कोविडवर मात करण्यात यशस्वी झाले. या डॉक्टर, वकील, पोलिस किंवा अन्य सरकारी कर्मचा-यांचे कुटूंबियही कोविडच्या संकटावर उपचाराअंती मात करून बरे झाले.गोव्यात आतापर्यंत कोविडने एकूण 44 व्यक्तींचे बळी घेतले. यापैकी बहुतेक रुग्ण हे वयाची साठी ओलांडलेले आहेत. वयाच्या पन्नाशीत पोहचलेले काही रुग्णही दगावले पण त्यांना अन्य प्रकारचे गंभीर आजारही होते. मुरगाव तालुक्यातील ज्या चौदा वर्षीय मुलीचा बळी गेला तिलाही गंभीर आजार होता. त्यामुळेच तिला अगोदर गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही वृद्ध महिलांचा कोविडने बळी घेतला. मोजकेच कोविडग्रस्त मात्र एरव्ही गंभीर आजार नसतानाही कोविडमुळे बळी गेले. ज्यांना अनेक वर्षे डायबेटीस किंवा रक्तदाबाचा त्रस आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी असे डॉक्टरांचे म्हणणो आहे. काही कॅन्सर रुग्ण, किडणी रुग्ण व हृदयविकाराचे रुग्ण कोविडच्या हल्ल्यात मरण पावले आहेत. को-मॉर्बिड स्थितीत असणा:या रुग्णांचा जीव कोविडमुळे जाणार नाही याची काळजी वैद्यकीय व्यवस्थेने घ्यायला हवी. मात्र गोव्यात त्याबाबत अपयश आल्याचे दिसून येते. दरम्यान, सत्तरी तालुक्यातील केरी येथील एका रुग्णाचे शुक्रवारी कोविडमुळे निधन झाले. त्यांच्यावर अन्य एका आजारासाठी उपचार सुरू होते, शिवाय त्याला कोविडही झाला होता. शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी त्याची प्राणज्योत मालवली. सत्तरी तालुक्यातील व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी बहुतांश बळी हे मुरगाव तालुक्यातील कोविडग्रस्तांचे गेले आहेत. त्यानंतर सासष्टी तालुक्याचा क्रमांक लागतो. बार्देशमध्येही तिघांचा कोविडने बळी घेतला. तिसवाडीत दोघांचा बळी यापूर्वी गेला आहे. कोविडमुळे मरण पावलेल्या व्यक्तींची संख्या शुक्रवारी 44 झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा