शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 06:24 IST

  गोव्यात आपले सरकार यावे, यासाठी भाजपाने मित्रपक्ष व अपक्ष यांना एकूण ७ मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. एकूण १२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे मुख्यमंत्र्यांसह केवळ पाचच मंत्री आहेत.

पणजी  -  गोव्यात आपले सरकार यावे, यासाठी भाजपाने मित्रपक्ष व अपक्ष यांना एकूण ७ मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. एकूण १२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे मुख्यमंत्र्यांसह केवळ पाचच मंत्री आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत शपथविधीनंतर दिल्लीला जाणार असून, तिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच खातेवाटप नक्की केले जाईल. तसेच मित्रपक्षांची खाती नक्की केली जातील.गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तिन्ही तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या तीनपैकी दोघांना मंत्री करण्यात आले आहे. तसेच तीन अपक्षांपैकी दोघे मंत्री झाले आहेत. भाजपा व मित्रपक्ष यांचे मिळून २१ आमदार असून, त्यापैकी १२ जण याप्रकारे मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याआधी विधानसभेचे अध्यक्ष होते. त्याजागी भाजपाचे राजेश पाटणकर यांची निवड अपेक्षित आहे. भाजपाचेच मायकेल लोबो उपाध्यक्ष आहेत.म्हणजे एकूण १४ जणांना काही ना काही पदे मिळाली आहेत. त्यामुळे उरलेल्या सात आमदारांनाखूश ठेवण्यासाठी कदाचितमहामंडळे वा अशीच काही पदे दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.गोव्यात महामंडळेही फारशी नाहीत. एक वेळ भाजपाच्या आमदारांची समजूत घालण्यात येईल. पण एक अपक्ष व गोवा फॉरवर्ड पक्षाचा एक अशा दोन आमदारांना महामंडळे मिळण्याची शक्यता आहे.प्रमोद सावंतांची आज सत्वपरीक्षापणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारला बुधवारी विधानसभेत सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागेल. ४0 सदस्यीय विधानसभेत सध्या ३६ आमदार आहेत. काँग्रेसकडे १४ आमदार असले तरी भाजपा व मित्रपक्ष, अपक्ष मिळून २१ आमदार आहेत. एक सदस्य सभापतीपदी असेल. बहुमतासाठी१९ जणांची गरज आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा