शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronaVirus News: गोव्यात ६० दिवसांत ७० वर्षांवरील १०० रुग्णांचा कोविडने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:43 IST

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे. ७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे.  ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे. मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने  दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण ...

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे.

७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे. 

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे.

मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने 

दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आजारातून ठीक झाले.

हजारो ज्येष्ठ नागरिकांनीही कोविडवर यशस्वी मात केली आहे. एकूण ४८ हजार २०० हून जास्त व्यक्तींना गोव्यात कोविडची बाधा झाली. रोज सरासरी दीडशे रुग्ण कोविडवर मात करत आहेत. ९५.७३ टक्के असे आजारातून बरे होण्याचे प्रमाण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा