शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याला आॅनलाईन सेक्सचा विळखा

By admin | Updated: December 22, 2014 01:49 IST

तपासात उघड : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; कारवाईमुळे पर्दाफाश

सूरज पवार-मडगाव : पर्यटकांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात आता आॅनलाईन सेक्स जोर धरू लागला आहे. गेल्या महिन्यात गुन्हा अन्वेषण विभागाने राज्यात वेबसाईटच्या मदतीने सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना एका विदेशी महिलेसह चार युवतींची सुटका केली होती. राजधानी पणजीत उत्तर प्रदेशातील एका आमदाराचे मुजरा प्रकरण गाजले होते. मसाज पार्लरच्या नावाने शहरात मोठ्या प्रमाणात कुंटणखाने चालू असून, यापूर्वी पोलिसांनी अशा पार्लरवर कारवाई केली. ग्रन्हा अन्वेषण विभागाने २२ नोव्हेंबर रोजी कळंगुट येथे छापा टाकून आॅनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या वेळी पोलिसांनी दोन दलालांना अटक करताना चार युवतींची सुटकाही केली होती. या युवतींपैकी दोन पंजाबमधील, एक हरियाणातील, तर एक तुर्कस्थान येथून आणण्यात आल्याची माहिती तपासात उघडकीस आली होती. वेबसाईटच्या मदतीने हा वेश्या व्यवसाय सुरू होता, अशी माहिती उघड झाली होती. ँ३३स्र:ह६६६.‘्र३३८ॅङ्मंी२ूङ्म१३२.ूङ्मे आणि ँ३३स्र:६६६.े्र’ी८.१४२२्रंल्ली२ूङ्म१३२.ूङ्मे या वेबसाईटवर युवतींच्या अश्लील छायाचित्रांसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सविस्तर माहितीही देण्यात आली होती. युवती पुरवण्यासाठी ग्राहकांना २0 हजारांपासून तीन लाखांपर्यंत रकमेचे पॅकेज, चांगल्या घराण्यातील युवती पुरवण्याचे आमिष आणि माहिती गोपनीय ठेवण्याची आश्वासने देण्यात आली होती. या वेबसाईट्स बंद करण्याच्या हालचाली सध्या सीआयडीतर्फे सुरू आहेत. मसाज पार्लरच्याच नावाखाली राज्यात खुलेआम वेश्या व्यवसाय चालत आहे. दक्षिणेतील कोलवा येथे अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात कोलवा पोलिसांनी अवादे मसाज या पार्लरवर छापा घातला असता तीन युवतींसह तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. या वेळी तीन ग्राहकांना, तसेच मसाज पार्लर व्यवस्थापक मिळून पाचजणांना अटक केली होती. या युवतींना मसाज पार्लरच्या आड वेश्या व्यवसायास जुंपले होते, असे तपासात उघडकीस आले होते. गेल्या वर्षी पर्वरी येथे मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथील पोलिसांना चक्क मराठी चित्रपट अभिनेताही सापडला होता. १0 एप्रिल २0१४ रोजी मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांनी खारेबांद, मडगाव येथील शेझेर या हॉटेलवर छापा घातला असता दोन अल्पवयीन मुलींसह एकूण चार तरुणी सापडल्या होत्या. या सर्वांची पोलिसांनी सुटका केली होती. तामिळनाडू येथील सांतिलकुमार एम. (४२), शिरवडे-नावेली येथील हॉटेलचा मॅनेजर लेस्टर बार्रेटो (४७), रुमबॉय अ‍ॅँथनी राज (२९) यांना अटक करण्यात आली होती. नंतर २५ हजार रुपयांच्या हमीवर त्यांची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली होती.