पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राज्यातील सर्व खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनांची मंगळवारी बैठक घेतली. खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांना दरवाढ द्या, अशी सूचना त्यांनी कंपन्यांना केली. गुरुवारपर्यंत (दि.२४) आपल्याला तुमचा निर्णय सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी खाण कंपन्यांना बजावले आहे. सेसा, साळगावकर, तिंबले, फोमेन्तो, चौगुले यांसह अन्य काही खाण कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतला. सरकारचे खाण सचिव, खाण खात्याचे संचालक, वाहतूक खात्याचे संचालक यांनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सहभागी करून घेतले. राज्यात खाण व्यवसाय नव्याने सुरू व्हायला हवा. त्यासाठी सहकार्य करा व ट्रकमालकांना दरवाढ करून द्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर बहुतेक कंपन्यांनी आपले सध्याचे दर सांगितले. कळणे येथे आम्ही केवळ सात रुपये प्रति टन दराने खनिज वाहतूक करतो, असे एका कंपनीने मुख्यमंत्र्यांना सांगितले. (पान ४ वर)
ट्रकमालकांना दरवाढ द्या
By admin | Updated: December 23, 2015 01:48 IST