शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करणार - गिरीश चोडणकर

By किशोर कुबल | Updated: October 15, 2023 16:03 IST

सभापती तवडकर हे याबाबतीत टाळाटाळ करून सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करत आहेत.

पणजी : आठ फुटीर काँग्रेसी आमदारांविरुध्दच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर हे सभापतींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करण्याच्या तयारीत आहेत.

चोडणकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने केशाम मेघाचंद्र सिंह प्रकरणात तीन महिन्यात सभापतींनी अपात्रता याचिका निकालात काढायला हवी, असे स्पष्ट आदेश दिले असतानाही सभापती रमेश तवडकर हे आठ फुटीर काँग्रेसी आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान ठरतो आणि त्यासाठीच मी अवमान याचिका सादर करण्याच्या तयारीत आहे.'

सभापती तवडकर हे याबाबतीत टाळाटाळ करून सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करत आहेत. भाजपने लोकशाही पायदळी तुडवून सत्ता हडपण्याचे सत्र आरंभले आहे. इतर पक्षांचे आमदार पळवणे एवढेच या पक्षाचे काम आहे.  अपात्रता याचिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील माझ्या आव्हान याचिकेवर न्यायालयाने सभापती तसेच आठही फुटीर आमदारांना नोटिसा बजावून लोकशाही वाचवण्यासाठी आशेचा किरण दाखवला आहे, असे चोडणकर यांनी पुढे म्हटले आहे.

याबाबतची पार्श्वभूमी अशी की, १४ सप्टेंबर २०२२ रोजी दिगंबर कामत, मायकल लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक व आलेक्स सिक्वेरा हे  आठ आमदार काँग्रेसमधून फुटले आणि त्यांनी विधिमंडळ पक्षच भाजपमध्ये विलीन केला. हे विलीनीकरण घटनाबाह्य असल्याचा दावा करून गिरीश यांनी अपात्रता याचिका सादर केलेली आहे.

टॅग्स :goaगोवा