शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

खाण पट्ट्यातील बेदरकार ट्रक वाहतुकीने लोकांच्या जीवाशी खेळ-  गिरीश चोडणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 14:39 IST

गोव्याच्या भाजप सरकारची गोमंतकीयांप्रती असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे.

मडगाव- गोव्यातील खाण पट्ट्यात सध्या जीवनावश्यक सेवेच्या नांवाखाली कोरोनाचा फैलाव झालेल्या कर्नाटकांतुन येणाऱ्या सुमारे २०० ट्रकांची बेदरकार वाहतुक चालु असुन, त्यामुळे स्थानिक लोकांच्या जीवाला गंभिर धोका निर्माण झाला आहे. बेशिस्त वाहतुकीमूळे भयंकर अपघात होण्याचे संकट उभे ठाकले आहे अशी भिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे.

संपुर्ण देशात लाॅकडाऊन मुळे आंतरराज्य वाहतुक बंद असताना गोवा सरकारने खनिज ट्रक वाहतुकीला कोणत्या आधारे परवानगी दिली हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. आपल्या क्रोनी केपिटालीजमचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मोदी सरकारने खाण व्यवसायाचा जीवनावश्यक सेवामध्ये समावेश केला आहे का हे भाजप सरकारने लोकांना सांगावे असे त्यांनी म्हटले आहे.

स्थानिक खाण अवलंबीतांवर सध्या उपासमारीची पाळी आलेली असताना, गोमंतकीयांचे ट्रक वापरणे सोडुन सरकार आज कर्नाटकांतील ट्रक मालकांना व चालकांना परवानगी देते, यावरुन गोव्याच्या भाजप सरकारची गोमंतकीयांप्रती असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे. गोवा सरकारला हवे असल्यास गोमंतकीयांचे ट्रक वापरण्याची विनंती ते कर्नाटकातील खाण मालकांकडे करु शकले असते. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कर्नाटकातुन येणारे ट्रक ड्रायव्हर, क्लिनर यांची कोरोना चांचणी केली जाते का व त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र कोण देतो हे सरकारने लोकांना सांगणे गरजेचे आहे.

दररोज कर्नाटकांतुन येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर वा क्लिनरकडुन गोमंतकीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहणार आहे. मुख्यमंत्र्यानी ताबडतोब खाणपट्ट्यात पोलीस व वाहतुक अधिकाऱ्याना पाठवुन बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन मुळे त्रस्त असलेल्या गोमतकीयांना शुल्लक कारणांसाठी चलन देऊन त्यांची सतावणुक करणाऱ्या पोलीसांची खरी गरज खाण पट्ट्यात आहे. गोवा दीवाळखोरीत काढलेल्या भाजप सरकारने लोकांना चलन देऊन महसुल गोळा करण्याचे नविन धोरण आखले आहे का हे मुख्यमंत्र्यानी सांगावे असे चोडणकर यानी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस