शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश चोडणकर यांचा गोवा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 20:29 IST

लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचा जो पराभव झाला, त्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले.

पणजी : राहुल गांधी हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत नसल्याने देशातील अनेक काँग्रेस नेते आपल्या पदांचे राजीनामे देत आहेत. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही प्रदेशाध्यक्षपद आपण सोडत असल्याचे शुक्रवारी येथे जाहीर केले आणि आपले राजीनामा पत्रही दिल्लीला पाठवून दिले.

लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचा जो पराभव झाला, त्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी देशभरातील काँग्रेसजनांनी केली पण गांधी राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत. गोव्यात लोकसभेच्या दोनपैकी एक जागा काँग्रेसने जिंकली. पूर्वी दोन्ही जागा भाजपकडे होत्या. मात्र यावेळी चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव केला. फ्रान्सिस सार्दिन निवडून आले. विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये मात्र केवळ एकच पणजीची जागा काँग्रेस पक्ष जिंकला. अर्थात हा वेगळा विषय असला तरी, गोवा प्रदेश काँग्रेसमध्येही या सर्व विषयांवरून चर्चा सुरूच आहे. पराभवानंतर व केंद्रात आणि गोव्यातही सत्ता न आल्याने गोव्यातील काँग्रेसचे काही आमदार हताश झालेले आहेत. मध्यंतरी ते काँग्रेसला सोडचिठ्ठीही देऊ पाहत होते. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर चोडणकर यांच्याही वाटय़ाला अस्वस्थता येत आहे.

मात्र चोडणकर यांनी राहुल गांधी हे राजीनामा देत असल्याने आपणही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले. देशभरातील पराभवाची जबाबदारी ही आम्हा सर्वाची सामुहिक जबाबदारी आहे. राहुल गांधी त्यांचा राजीनामा  मागे घेत नसल्याने आपल्याला स्वत:ला प्रदेशाध्यक्षपदी राहणो नैतिकदृष्टय़ा योग्य वाटत नाही अशी भूमिका चोडणकर यांनी घेतली आहे. चोडणकर येत्या 1 रोजी दिल्लीला जात आहेत. त्यांचा राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नसल्याने तूर्त ते प्रदेशाध्यक्षपदी राहतात. त्यांनी आपले लेखी राजीनामा पत्र मात्र दिल्लीला पाठवून दिले.