शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला, पणजीत ‘फुलांना फुल्ल मार्केट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 20:56 IST

पूजा व सजावट म्हटली की फुलं आलीच. फुलांशिवाय देवाची पूजा-अर्चना होत नाही. त्यामुळेच बाजारपेठेत फुलांचे दर दुप्पट वाढले असले तरीही ग्राहक बिनधास्तपणे खरेदी करत होते. फुले विक्रेतेही पहाटेपासून व्यस्त होते, तर बऱ्याच जणांनी फुलांची आगाऊ बुकींग केली होती. 

योगेश मिराशीपणजी : गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र उत्साह  दिसून येत आहे. तर, गणेश पुजेसाठी लागणारे साहित्य आणि फुलांनी बाजार गजबजला आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पणजी येथील बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली होती. बाजारात पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याने फुलांच्या किमतीही दुप्पट पाहायला मिळाल्या. त्यामुळे पणजीत फुलांना बुधवारी ‘फुल्ल’ मार्केट होते.

पूजा व सजावट म्हटली की फुलं आलीच. फुलांशिवाय देवाची पूजा-अर्चना होत नाही. त्यामुळेच बाजारपेठेत फुलांचे दर दुप्पट वाढले असले तरीही ग्राहक बिनधास्तपणे खरेदी करत होते. फुले विक्रेतेही पहाटेपासून व्यस्त होते. तर बऱ्याच जणांनी फुलांची आगाऊ बुकींग केली होती. गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाला प्रत्येकदिवशी फुलांची आरस दाखविली जाते. काही गणेश भक्तांनी विक्रेत्यांकडे पूर्वनियोजित फुलांची आगाऊ पद्धतीने आरक्षण करून ठेवले होते, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारपेठात स्थानिक व्यापाऱ्यांकडे शेवंती, जाई ही फुले होती. तसेच कोल्हापूर, बेळगाव येथून झेंडू, गुलाबांची आयात केली होती. यावेळी फुलांचा हार पाचशे रुपयांपासून ते पाचहजार रुपयापर्यंत उपलब्ध होता. तर मंडळांच्या गणपतीसाठी लागणारे हार हे दहा हजार ते वीस हजारापर्यंत मिळत आहेत. या हारांची हातोहात खरेदी-विक्री होत होती, त्यामुळे अनेक विक्रेत्यांचे हात हार गुंतविण्यात व्यस्त होते. साधारणपणे विक्रेते १५ ते २० रुपयांची सुटी फुले व्यापारी देतात. पण, आज बाजारात सुट्ट्या फुलांसाठी ग्राहकांना ३०-४० रुपये मोजावे लागत होते. तर काही विक्रेते सुटी फुले देण्यास नकार देत होते. चतुर्थीनिमित्त फुलांना प्रचंड मागणी असून दर दुप्पट झाल्याची माहिती पणजीतील फुल विक्रेता रितेश नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. 

दरम्यान, सफरचंदचेही दर वाढले आहेत. ते १६० ते २०० रुपये किलोने, केळी (वेलची ४० रु. किलो), तर इतर केळी ७० ते ८० रुपये किलोने मिळत आहेत. विशेष म्हणजे सफरचंद हे माटोळीला बांधतात.

फुलं           सध्याचे दर रुपयांमध्ये      अन्य दिवसांत (रुपये)गुलाब              २०                                    ७ ते १०         झेंडू                 १५०                                   ६०शेवंती               ३५० (किलो)                     २०० (किलो)जाईची माळ        ५०                                   ३० 

टॅग्स :goaगोवाGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८