शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील खाण अवलंबितांशी साधला गडकरींनी संवाद, अॅटर्नी जनरलांचा सल्ला घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 18:38 IST

मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील खनिज खाणींवर अवलंबून असलेले बार्ज मालक, ट्रक मालक, कामगार, कर्मचारी, मशिनरीधारक, काही पंचायती, पालिका व अनेक वर्षे खाण धंदा केलेले खनिज व्यवसायिक यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

पणजी : गोव्यातील 88 खनिज लिजेस रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश गेल्या 7 फेब्रुवारी रोजी आला. त्यानंतर गेल्या दि. 16 मार्चपासून सर्व खनिज खाणी बंद झाल्या. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील खनिज खाणींवर अवलंबून असलेले बार्ज मालक, ट्रक मालक, कामगार, कर्मचारी, मशिनरीधारक, काही पंचायती, पालिका व अनेक वर्षे खाण धंदा केलेले खनिज व्यवसायिक यांच्याशी सविस्तर संवाद साधला. खनिज खाणी सुरू होईर्पयत आमची कज्रे सरकारने ताब्यात घ्यावीत, तसेच खाण अवलंबितांना पॅकेज दिले जावे अशी मागणी बहुतेकांनी केली. आयटक ह्या कामगार संघटनेने शासकीय महामंडळ स्थापन करून खाणी चालविल्या जाव्यात अशी मागणी केली व त्याविषयी अॅटर्नी जनरलांचा सल्ला घेण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.केंद्रीय जहाजोद्योग मंत्री असलेल्या गडकरी यांनीच गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात येऊन गोव्यात भाजपप्रणीत आघाडी सरकार घडविले होते. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे सध्या अमेरिकेत त्यांच्यावरील आजारावर उपचार घेत आहेत. यामुळे गडकरी हे स्वत: सोमवारी रात्री गोव्यात आले. मंगळवारी दुपारी बारा वाजल्यापासून कांपाल-मिरामारच्या पट्टय़ातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून गडकरी यांनी बैठका घेतल्या. गोव्यातील खनिज खाणप्रश्न कशा प्रकारे सोडविता येईल व नव्याने लवकर खनिज खाणी कशा सुरू करता येईल असा विचार करून गडकरी यांनी गोव्यातील ट्रक मालक, खनिजवाहू बार्ज मालक, गोव्यातील खाण मालक यांच्याशी बराचवेळ चर्चा केली. आमच्यावर बरीच मोठी कज्रे आहेत. खाणी बंद झाल्याने आमचा धंदा अडचणीत आला. अशावेळी सरकारने आम्हाला मदत करावी अशी मागणी बार्ज मालक, ट्रक व्यवसायिक आणि अन्य घटकांनी केली.गोवा खनिज निर्यातदार संघटनेने गडकरी यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निवाडय़ांचा आणि एमएमडीआर कायद्याचा तसेच गोव्यातील खाणींशीनिगडीत सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून मगच केंद्राने निर्णय घ्यावा व गोव्यातील खाणी लवकर सुरू कराव्यात अशी मागणी आम्ही गडकरी यांच्याकडे केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अंबर तिंबले यांनी पत्रकारांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका संघटनेकडून या आठवडय़ाच्या अखेरीस सादर केली जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी उद्योगपती शिवानंद साळगावकर हेही उपस्थित होते.गोव्यातील शंभरपेक्षा जास्त बार्ज व्यवसायिकांनी एकूण 1क्9 कोटींचे कर्ज घेतलेले आहे. खाणी बंद झाल्याने आमचा धंदा बंद होणार आहे. त्यामुळे सरकारने  आम्हाला मदत करावी अशी मागणी आम्ही केल्याचे बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष रेमंड डिसा यांनी सांगितले. अतुल जाधव यांनीही भूमिका मांडली. 

महामंडळ स्थापन करा आयटक ह्या कामगार संघटनेचे नेते ािस्तोफर फोन्सेका, अॅड. सुहास नाईक आदी गडकरी यांना भेटले व निवेदन सादर केले. सध्याच्या खाण कंपन्यांकडेच लिजेस कायम ठेवायला आमचा विरोध आहे. कारण लिजेस रद्द झालेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सर्वानी मान्य करावा आणि सरकारने खनिज विकास महामंडळ स्थापन करून त्या महामंडळामार्फत गोव्यातील खनिज खाणी चालवाव्यात अशी मागणी आम्ही केल्याचे फोन्सेका यांनी पत्रकारांना सांगितले. गडकरी यांनी याविषयी अॅटर्नी जनरलांचे मत घेणार असल्याची ग्वाही दिल्याचे सुहास नाईक यांनी सांगितले. बंदी काळात खाणींवरील कामगारांना व कर्मचा:यांना महामंडळाने पगार द्यावा अशी मागणी आपण केल्याचे फोन्सेका यांनी सांगितले. कामगार संघटनेचे नेते पुतू गावकर हेही गडकरी यांना भेटले.